फक्त १० रूपयाच्या SIP ने पण कमवू शकता १ करोड | Earn 1 Crore by investing only Rs 10 SIP in Marathi

How to earn 1 Crore by SIP, How can I get 1 crore from SIP in marathi, 1 crore SIP calculator, SIP for 1 crore in 15 year, How much SIP to earn 1 crore in 10 years, How much SIP Should I do to earn 1 crore in 20 years, How to earn 1 Crore via mutual fund SIP

सुरुवात :

मागच्या एका आर्टिकल मध्ये आम्ही ६०० रूपयाच्या SIP ने १ करोड कसे कमवायचे हे सांगितल होत, पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे की फक्त १० रूपयाच्या महिन्याच्या SIP ने सुद्धा तुम्ही १ करोड कमवू शकता, विश्वास ठेवा हे पण शक्य आहे, कारण इन्वेस्टमेंट ची पॉवरच तशी आहे, शेअर मार्केट मध्ये दीर्घ काळ इन्वेस्ट केले की पैसा अधिक पटीने वाढत जातो. १० रूपयाच्या महिन्याच्या SIP ने १ करोड कमवण्यासाठी थोडीशी वेगळी technique वापरावी लागेल, ती कशी ते ह्या आर्टिकल पूर्ण वाचल्यावर तुम्हाला कळेल.

सर्वात आधी ह्या दोन गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, SIP म्हणजे काय आणि Power of Compounding म्हणजे काय.

SIP म्हणजे काय :

SIP म्हणजे Systematic Investment Plan, म्हणजे दरमहा एक ठराविक रक्कम एका ठरविक काळासाठी गुंतवणे, SIP मुळे तुमच्या पैशाची बचत पण होते आणि गुंतवणूक पण होते, हा एक खूप चांगला पर्याय आहे जर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे आणि तुम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नसेल, SIP बद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर आमचा SIP म्हणजे काय हा आर्टिकल वाचू शकता.

Power of Compounding म्हणजे काय :

Power of Compounding मध्ये गुंतवणूक केलेल्या पैसाच्या व्याजवर व्याज मिळून गुंतवलेली रक्कम खूप पटीने वाढते, ह्यामध्ये interest ची compounding होते आणि ह्या compounding ला जगातले आठवे आश्चर्य सुद्धा म्हटले जाते आणि ह्या सगळ्याला मराठी मध्ये चक्रवाढ व्याज असे म्हणतात, ह्या चक्रवाढ व्याजाच्या मदतीने आपल्याला १० रूपयाच्या SIP ने सुद्धा १ करोड कामावण्यास मदत होते.

फक्त १० रूपयाच्या SIP ने १ करोड कसे कामवायचे | How to earn 1 Crore by Rs 10 SIP only in Marathi :

फक्त १० रुपये महिन्याला गुंतवून १ करोड कमवणे हे फक्त शेअर मार्केट मध्ये SIP करूनच शक्य आहे, ह्यामध्ये काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, जेवढ्या लवकर इन्वेस्टमेंट सुरू करता येते तेवढ्या लवकर सुरू करा, दीर्घकाळ पैसे गुंतवून ठेवा, दरवर्षाला जसजसा पगार वाढतो तसतशी SIP ची रक्कम वाढवत जा, चांगला म्यूचुअल फंड निवडा जेणेकरून १२% ते १५% पर्यन्त CAGR मिळेल.

वय २० वर्षे असेल तर इन्वेस्टमेंट कशी करायची :

जेवढी लवकर गुंतवणूक कराल तेवढी चांगली, म्हणून २० वयापासून गुंतवणूक केलीत तर नक्कीच हे सहजपणे शक्य होईल, फक्त ही पद्धत लक्षात ठेवा, विसाव्या वर्षी १० रूपयाच्या SIP ने सुरुवात करा आणि दरवर्षी ती ५० रुपयाने वाढवा, असे वयाच्या ३० वर्षापर्यंत करा, त्यानंतर ३१ व्या वर्षी १,००० रूपयाच्या SIP ने सुरुवात करा आणि ती १०% ने दरवर्षी वाढवत जा, असे केल्याने १२% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ६० व्या वर्षी १ करोड मिळतील.

वय २५ वर्षे असेल तर इन्वेस्टमेंट कशी करायची :

२५ वर्षामध्ये SIP ला सुरुवात करत असाल तर थोडेसे बदल करावे लागतील, पंचविसाव्यावर्षी १० रूपयाच्या SIP ने सुरुवात करा आणि दरवर्षी ती ७० रुपयाने वाढवा, असे वयाच्या ३५ वर्षापर्यंत करा, त्यानंतर ३६ व्या वर्षी १,८०० रूपयाच्या SIP ने सुरुवात करा आणि ती १०% ने दरवर्षी वाढवत जा, असे केल्याने १३% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ६० व्या वर्षी १ करोड मिळतील.

वय ३० वर्षे असेल तर इन्वेस्टमेंट कशी करायची :

३० वर्षामध्ये SIP ला सुरुवात करत असाल आणि १० रूपयाच्या SIP ने सुरुवात केली तर ती दरवर्षी १०० रुपयाने वयाच्या ३५ वर्षापर्यंत वाढवावी लागेल, त्यानंतर ३६ व्या वर्षापासून २,००० रूपयाची SIP करा आणि ती १०% ने दरवर्षी वाढवत जा, असे केल्याने १३% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ६० व्या वर्षी तुम्हाला १ करोड मिळतील.

वय ३५ वर्षे असेल तर इन्वेस्टमेंट कशी करायची :

३५ वर्षामध्ये SIP ला सुरु करणे थोडे उशीर करण्यासारखे होईल पण काळजी करू नका तुम्ही पण १ करोड कमवू शकता, १० रूपयाच्या SIP ने सुरुवात करून ती दरवर्षी १०० रुपयाने वयाच्या ४० वर्षापर्यंत वाढवा, त्यानंतर ४१ व्या वर्षापासून ३,००० रूपयाची SIP करा आणि ती १२% ने दरवर्षी वाढवत जा, असे केल्याने १५% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ६० व्या वर्षी तुम्हाला १ करोड मिळतील.

वय ४० वर्षे असेल तर इन्वेस्टमेंट कशी करायची :

४० वर्षापासून SIP ला सुरु करणे म्हणजे जरा जास्त उशीर झाला आहे कारण १ करोड कमवण्यासाठी १० रुपयाची SIP पुरेशी नाही, त्यासाठी थोड्या जास्त रकमेपासून सुरुवात करावी लागेल, तुम्हाला ५०० रुपायाची SIP सुरू करावी लागेल आणि ती दरवर्षी ४५ वयापर्यंत ५०० रुपयाने वाढवावी लागेल, त्यानंतर ४६ व्या वर्षापासून ५,८०० रूपयाची SIP करा आणि ती १५% ने दरवर्षी वाढवत जा, असे केल्याने १५% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ६० व्या वर्षी तुम्हाला १ करोड मिळतील.

वरील सर्व सल्यामद्धे आम्ही उदाहरण म्हणून २०, २५, ३० आणि ४० हे वय घेतले आहे, पण तुम्ही तुमच्या वयानुसार हे चेक करू शकता, आम्ही तुमच्यासाठी SIP calculator ची एक excel sheet बनवली आहे आणि त्याची लिंक खाली दिली आहे, त्यात तुम्ही तुमच्या वयाप्रमाणे बदल करून किती रक्कम गुंतवावी हे बघू शकता.

Excel Link – Rs 10 to 1 Crore SIP calculator

१० रुपयाची SIP कुटे करायची :

Navi म्यूचुअल फंड च्या अप्प मध्ये ही सुविधा सुरू आहे, तुम्ही Navi अप्प play store मधून डाउनलोड करू शकता, त्यामध्ये जाऊन तुम्ही आम्ही दिलेल्या सल्यानुसार योग्य तो म्यूचुअल फंड निवडा आणि SIP सुरू करा.

गुंतवणूकेमधील वयाचे महत्व :

वरच्या उदाहरणावरून तुम्हाला कळले असेल की जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तितके कमी पैसे तुम्हाला गुंतवावे लागतील, ह्यावरून आपल्याला वयाचे किती महत्व आहे ते कळते, म्हणून SIP जितक्या लवकर कराल आणि जास्त काळ गुंतवणूक कराल तितके जास्त तुम्हाला रिटर्न्स मिळतील.

१ करोड कमवण्यासाठी गुंतवणूकेची शिस्त असणे खूप महत्वाचे :

पण ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे “गुंतवणूकेची शिस्त”, वरील दिलेल्या सल्याप्रमाणे जर तुम्ही शिस्त ठेवून दरवर्षी ६० वर्षापर्यंत गुंतवणूक करत राहिलात तर आणि तरच तुम्ही ठरवलेली रक्कम मिळवू शकता, नाहीतर शक्य होणार नाही, त्यामुळे लक्षात ठेवा, शिस्तीने दरवर्षी गुंतवणूक करत रहा, नक्कीच तुम्हाला ठरवलेली रक्कम मिळणे शक्य होईल.

१ करोड कमवण्यासाठी सर्वोत्तम म्यूचुअल फंड कसा निवडावा :

चांगला म्यूचुअल फंड निवडणे हेही तितकेच महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळण्यास मदत होईल आणि १ करोड कमवू शकाल, चांगला म्यूचुअल फंड निवडणे हे सर्वतः तुमच्या रिस्क प्रॉफिल वर अवलंबून आहे, तुमची जोखीम घेण्याची किती क्षमता किती आहे हे तुम्ही नक्कीच चेक केले पाहिजे, पण शेअर मार्केट ची काहीच माहिती नसेल तर Large cap Index Fund मध्ये गुंतवणूक करणे अति उत्तम, कारण लार्ज कॅप इंडेक्स फंड मध्ये भारतातील टॉप ३० कंपण्यामद्धे गुंतवणूक केली जाते आणि त्या कंपन्या खूप सुरक्षित मानल्या जातात.

लार्ज कॅप इंडेक्स फंड ची निवड करण्यासाठी फक्त २ ते ३ पॉईंट्स लक्षात ठेवावे लागतात, (१) Expense Ratio – सर्वात कमी असणे उत्तम, (२) Tracking Error – सर्वात कमी असणे उत्तम, (३) Reputed Fund House – इंडेक्स फंड ज्या फंड हाऊस चा आहे त्याचे मार्केट मध्ये नाव कसे आहे, तो प्रसिद्ध आहे की नाही, थोडक्यात बँकिंग फंड हाऊस निवडणे योग्य ठरेल, (उदा: HDFC Mutual Fund, ICICI Mutual Fund, Axis Mutual Fund, etc.)

निष्कर्ष :

आम्ही आशा करतो की तुम्हाला समजले असेल की १ करोड कामावण्यासाठी किती रकमेची SIP करावी लागेल आणि किती काळ करावी लागेल, एथे मी फक्त १ करोड चेच उदाहरण घेतले आहे, पण हेच लॉजिक १० करोड साठी पण लागू होते, कारण जर १० रुपयाने १ करोड कमवले जातात, तर तेच लॉजिक वापरुन १०० रूपयाच्या SIP ने १० करोड कमवू शकतो, म्हणून लवकर SIP सुरू करा आणि करोडपती व्हा. ह्या बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करून विचारा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.

FAQs

  1. Q: How much to invest to get 1 crore in 20 years in Marathi ?

    Ans: ३,२०० ची SIP सुरू करून ती दरवर्षी १२% ने वाढवावी लागेल आणि १५% CAGR रिटर्न्स च्या हिशोबाने २० वर्षानंतर तुम्हाला १ Crore मिळतील.

  2. Q: How much SIP for 1 Crore in 15 years in Marathi ?

    Ans: ८,५०० ची SIP सुरू करून ती दरवर्षी १२% ने वाढवावी लागेल आणि १५% CAGR रिटर्न्स च्या हिशोबाने १५ वर्षानंतर तुम्हाला १ Crore मिळतील.

हे पण वाचा :

ह्या Web Stories पण बघा, तुम्हाला नक्कीच आवढतील :

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

4 Comments

    1. तुम्ही लार्ज कॅप इंडेक्स म्यूचुअल फंड पासून सुरुवात करा, आणि हळू हळू शेअर मार्केट आणि म्यूचुअल फंड ची माहिती घेऊन मग इन्वेस्ट करा, मी असे तुम्हाला सांगू शकत नाही, ते सेबी च्या नियमा विरुद्ध आहे,
      मुला साठी करायचे आहे म्हणजे तुमच्या कडे खूप वेळ आहे, तुम्ही माहिती घ्या, आमची वेबसाइट रोज बघा, आम्ही यामध्ये खूप माहिती सोप्या पद्धतीने सांगतो, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, नवीन माहिती मिळेल,
      मूल साठी किती पैसे हवे ते माहीत करून घ्या, म्हणजे तुमचे आर्थिक नोयोजन करा, त्यासाठी आमचा आर्थिक नोयोजन कसे करायचे हा आर्टिकल वाचा.

  1. sheetal shindesays:

    (१) Expense Ratio – सर्वात कमी असणे उत्तम, (२) Tracking Error – सर्वात कमी असणे उत्तम, he kuthe aani kas shodhaych

    1. हे तुम्ही upstox ह्या app वर मिळवू शकता, त्यासाठी तुम्ही upstox च्या app किंव्हा वेबसाइट वर जाऊन त्या इंडेक्स म्यूचुअल फंड चे नाव टाकून सर्च करा, तुम्हाला tracking error, expense ratio आणि सर्व माहितीही मिळेल.

      upstox ची लिंक – https://upstox.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Benefits of investing in Mutual Funds 2023 SIP ने करोंडपती बनायचे आहे, ह्या चुका करू नका How to become successful investor in Marathi डिजिटल रूपी म्हणजे काय ?
Benefits of investing in Mutual Funds 2023 SIP ने करोंडपती बनायचे आहे, ह्या चुका करू नका How to become successful investor in Marathi डिजिटल रूपी म्हणजे काय ?
रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर