Mutual Fund म्हणजे काय | Mutual Fund meaning in Marathi

what is mutual fund in marathi, mutual fund investment in marathi, What is mutual funds in simple words in marathi, what is mutual funds in India in marathi, what is mutual funds and how does it work in marathi, Definition of mutual funds in marathi, meanings of mutual funds in marathi

Table of Contents

सुरुवात :

म्यूचुअल फंड हा प्रकार आजकाल खूप प्रसिद्ध झाला आहे, सगळीकडे चर्चा आहे की म्यूचुअल फंड मध्ये इन्वेस्ट केले पाहिजे, सगळ्याचं ऐकून आपल्यालाली वाटते की म्यूचुअल फंड मध्ये इन्वेस्ट केले पाहिजे, पण थोडी भीती वाटते, तोटा झाला तर काय, माझे पैसे बुडाले तर काय, असे वाटणे साहजिकच आहे कारण म्यूचुअल फंड म्हणजे काय हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे ही भीती वाटत असते, पण काळजी नका करू इथे आपण म्यूचुअल फंड बद्दल सगळ काही समजून घेऊया.

म्यूचुअल फंड म्हणजे काय | What is mutual fund in Marathi :

म्यूचुअल फंड म्हणजे असा फंड जेथे गुंतवणूकदारांचे पैसे एकत्रित केले जातात आणि त्या फंड च्या फंड मॅनेजर द्वारे तज्ञ ज्ञान वापरुन सुरक्षित ठिकाणी गुंतवले जातात जेणे करून त्या गुंतवलेल्या पैशामधून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळतील.

म्यूचुअल फंड म्हणजे काय सोप्या भाषेत | What are mutual funds in simple words in Marathi :

सोप्या भाषेत समजून घेऊया म्यूचुअल फंड म्हणजे काय, समझा तुम्ही फ्रूट मर्कट मध्ये गेला आहात आणि तुम्हाला काही फळ खायची इच्छा झाली पण तुम्हाला फळ कसे विकत घ्यायचे हे माहीत नाही, फळ चांगले आहे की खराब, चांगल फळ कसे घ्यावे, वैगेरे, ह्याची माहिती नाही आणि तुमच्या खिशात फळ घेण्यासाठी पैसेही कमी आहेत, त्यामुळे तुम्ही फळ घेऊ नाही शकणार.

त्यावर एक फळवाला तुम्हाला फ्रूट प्लेट घेण्यास सल्ला देतो, त्या फ्रूट प्लेट मुळे पैसे ही कमी लागले, चंगली फळे ही खायला मिळाली आणि वेगवेगळ्या प्रकार ची फळे खायला मिळाली, ह्या उदहरणामद्धे, फ्रूट प्लेट म्हणजे म्यूचुअल फंड, फळ म्हणजे ज्या ठिकाणी इन्वेस्ट करायचे आहे ते साधन आणि ज्याने तुम्हाला सल्ला दिल तो फंड मॅनेजर.

तात्पर्य काय की, गुंतणूकीची माहिती नसेल तरी तुम्ही म्यूचुअल फंड मध्ये कमी पैशात एक्स्पर्ट द्वारे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून पैसे कमवू शकता.

What are the mutual fund marathi
Mutual Fund

म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक का केली पाहिजे | Why should you invest in mutual funds in Marathi :

म्यूचुअल फंड मध्ये फंड मॅनेजर द्वारे गुंतवणूक केली जाते आणि फंड मॅनेजर हा शेअर मार्केट मधील ज्ञानी असतो, तो शेअर मार्केट मधील निर्णय त्याचा अनुभव आणि शेअर मार्केट मधील उतार चढाव ह्याचा अंदाज लावून घेत असतो, म्हणून त्याचे निर्णय अचूक ठरतात आणि म्यूचुअल फंड मधून चांगले रिटर्न्स मिळतात, त्याऐवजी जर तुम्हाला थेट शेअर मार्केट मध्ये इन्वेस्ट करायचे असेल तर तुम्हाला शेअर मार्केट ज्ञान असणे गरजेचे आहे, पण ज्ञान नसेल तर तुम्ही म्यूचुअल फंड द्वारेच गुंतवणूक केली पाहिजे, कारण ज्ञान नसेल तर आपले खूप नुकसान होऊ शकते, आपले बहुतेक निर्णय हे भावनेच्या आधारावर घेतले जातात, जे चुकीच आहे.

म्यूचुअल फंड मध्ये इन्वेस्ट करण्याचे फायदे | Advantages of investing in mutual funds in Marathi :

म्यूचुअल फंड मध्ये इन्वेस्ट करण्याचे खूप फायदे आहेत पण आपण काही महत्वाचे फायदे बघूया

  • तज्ञ ज्ञानाचा वापर – फंड मॅनेजरद्वारे तज्ञ ज्ञानाचा वापर केल्याने तुमचे पैसे चंगल्या ठिकणी गुणवले जातात.
  • जोखीमेचे विभाजन – म्यूचुअल फंड मध्ये वेगवेगळ्या कंपनीमध्ये इन्वेस्ट केल्याने जोखीमेचे विभाजन उत्तमरीत्या होते.
  • कमी रकमेणे सुरुवात – म्यूचुअल फंड मध्ये कमी पैशाने म्हणजे अगदी १०० रुपयाने सुद्धा सुरुवात केली जाते.
  • त्वरित पैसे काढण्याची मुभा – म्यूचुअल फंड मधून आपण कधीही आणि कुठूनही पैसे काढू शकतो.

म्यूचुअल फंड मधील फेदयांबद्दल अधिक माहिती साठी आमचा म्यूचुअल फंड मध्ये इन्वेस्ट करण्याचे फायदे हा आर्टिकल वाचा, तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

म्यूचुअल फंड चे प्रकार | Types of mutual funds in Marathi :

म्यूचुअल फंड मुख्यतः तीन प्रकारचे असतात, डेब्ट म्यूचुअल फंड, इक्विटि म्यूचुअल फंड आणि हायब्रिड म्यूचुअल फंड, डेब्ट म्यूचुअल फंड fix securities मध्ये इन्वेस्ट करतात, इक्विटि म्यूचुअल फंड म्हणजे शेअर मार्केट मध्ये इन्वेस्ट करतात आणि हायब्रिड म्यूचुअल फंड हे डेब्ट आणि इक्विटि ह्या दोन्ही मध्ये इन्वेस्ट करतात. इक्विटि म्यूचुअल फंड मध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, लार्ज & मिड कॅप, दिविडेन्ट फंड, वॅल्यू फंड, ELSS, वैगेर येतात. डेब्ट म्यूचुअल फंड मध्ये ओवरनाइट फंड, लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड, शॉर्ट टर्म, कॉर्पोरेट बॉन्ड फंड, बँकिंग & PSU फंड, वैगेरे. हायब्रिड फंड मध्ये conservative हायब्रिड फंड, बॅलेन्स हायब्रिड फंड, aggressive हायब्रिड फंड, वैगेरे.

Types of mutual fund in marathi

म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करायची | How to invest in mutual funds in Marathi :

म्यूचुअल फंड मध्ये इन्वेस्ट करण्यासाठी सर्वात आधी आपण आपली ध्येय काय आहेत हे समजून घेतले पाहिजे, ध्येयाशिवाय गुंतवणूक करणे चुकीचे ठरेल, आपले कोणते ध्येय कोणत्या वर्षी पूर्ण करायचे आहे आणि त्यासाठी किती पैसे हवे आहेत, ह्या सर्व ध्येयाची एक यादी आपण बनवली पाहिजे, जेणेकरून किती पैसे कुठे गुंतवावे ह्याचा अंदाज येईल, त्यासाठी आमचा “आर्थिक ध्येयाप्रमाणे गुंतवणूक कशी करायची” हा आर्टिकल वाचू शकता.

ध्येय थरवल्यानंतर, आपण कालावधी प्रमाणे गुंतवणूक केली पाहिजे, काही ध्येय कमी काळासाठी असतात आणि काही दीर्घ काळासाठी, आपल्याला त्याप्रमाणे गुंतवणूक केली पाहिजे.

mutual fund as per horizon

म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक कुठे करायची | Where to invest in mutual funds in Marathi :

मार्केट मध्ये खूप सारे अप्प उपलब्द आहेत (जसे की Upstox, Zerodha, Groww, Paytm money, 5paisa, etc) ज्या मध्ये अकाऊंट ओपेन केल्यावर आपण सहजरीत्या कोणत्याही म्यूचुअल फंड मध्ये इन्वेस्ट करू शकतो, काही अप्प मध्ये demat अकाऊंट ओपेन करावे लागते, त्याद्वारे आपण शेअर मार्केट मध्ये सुद्धा थेट गुंतवणूक करू शकतो.

सर्वोत्तम म्यूचुअल फंड ची निवड कशी करायची | How to choose best mutual funds in Marathi :

म्यूचुअल फंड मध्ये मुख्यतः मार्केट कॅप नुसार तीन प्रकार असतात, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्यूचुअल फंड, कोणत्या प्रकारामध्ये गुंतवणूक करावी हे खाली दिलेल्या स्टेप नुसार समजून घ्या आणि चांगल्या म्यूचुअल फंड ची निवड करा.

  • तुमचे ध्येय निक्षित करा – सर्वात आधी तुमचे ध्येय काय आहे ह्याची यादी बनवा.
  • जोखीम प्रोफाईल निवडा – तुमची जोखीम घेण्याची किती तयारी आहे ते चेक करा.
  • फंड मॅनेजर – फंड मॅनेजर चा बॅकग्राऊंड काय आहे, त्याला किती अनुभव आहे, तो मॅनेज करत असलेले दुसऱ्या फंड ची काय स्थिति आहे, वैगेरे.
  • फंड ची कामगिरी – फंड ने गेल्या ५ वर्षात किती रिटर्न्स दिलेत, टॉप १० म्यूचुअल फंड मध्ये समाविष्ट आहे का, कॅटेगरी रिटर्न्स वर मात केली आहे का, वैगेरे.
  • मंदी मधील फंड ची परिस्थिति – जेव्हा शेअर मार्केट खूप खाली येते तेव्हा फंड ने स्वताला किती सावरले ते चेक करा.
  • फंड पोर्टफोलियो – फंड ने कोणत्या शेअर मध्ये इन्वेस्ट केले आहे ते चेक करा.
  • एक्जिट पॉइंट – फंड एक्जिट पेनॉल्टी चेक करा.
  • Expense रेशियो – फंड चा expense रेशियो चेक करा.

ह्याबद्दल सविस्तर माहिती साठी आमचा “सर्वोत्तम म्यूचुअल फंड कसा निवडावा” हा आर्टिकल वाचू शकता.

म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती | Right time to invest in mutual funds in Marathi :

गुंतवणूक करण्याची सर्वात महत्वाची आणि योग्य वेळ म्हणजे आजची वेळ, ज्या दिवशी तुम्ही गुंतवणूक करायचे ठरवाल त्याच दिवशी तुम्ही गुंतवणूक करणे चालू केले पाहिजे, जेवढे उशीर कराल तेवढे जास्त पैसे गुंतवावे लागतील, कारण जेवढ्या आधी गुंतवणूक कराल आणि जितके जास्त काळासाठी कराल तेवढे जास्त रिटर्न्स तुम्हाला शेअर मार्केट मध्ये मिळतात, वॅरेन बफेट ला सुद्धा चांगले रिटर्न्स हे शेवटच्या ४ ते ५ वर्षामध्येच मिळाली.

म्यूचुअल फंड मध्ये गुंतवलेले पैसे कधी काढायचे | When to withdraw money from mutual funds in Marathi :

शेअर मार्केट हे साधारणतः ३ वर्षामध्ये वर खाली होत असते, उदाहरण – २००८ मध्ये खाली गेले, २०१० मध्ये वर आले, २०१६ पडले पण २०१८ वर आले, २०२० ला पडले २०२२ ला वर आले, म्हणून आपण शेअर मार्केट मधून एकदम पैसे न काढत टप्या टप्या ने काढेले पाहिजे आणि तुमचा financial गोल काय आहे हे माहीत असले पाहिजे, जेव्हा तुमचा गोल जवळ येत असेल त्याच्या ३ वर्षा आधीपासून तुम्ही टप्या टप्या ने पैसे काढायला सुरुवात केली पाहिजे, हा शेअर मार्केट मधून पैसे काढण्याचा सर्वात उत्तम पर्याय आहे.

म्यूचुअल फंड मध्ये टॅक्स किती द्यावा लागतो | How to calculate tax on sale of mutual funds in Marathi :

म्यूचुअल फंड वरील टॅक्स हा त्याच्या पर्यायावर निर्धारित असतो, जर इक्विटि म्यूचुअल फंड असेल आणि मिळालेला नफा हा लॉन्ग टर्म असेल तर १ लाखाच्या वर १०% कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो आणि शॉर्ट टर्म असेल तर १५% आणि जर डेट म्यूचुअल फंड असेल तर मिळालेला नफा हा तुमच्या इन्कम मध्ये जोडला जाईल आणि तुमच्या टॅक्स स्लॅब नुसार टॅक्स भरावा लागेल.

निष्कर्ष :

आम्ही आशा करतो की तुम्हाला म्यूचुअल फंड काय आहे हे समझले असेल, म्यूचुअल फंड मधील सर्व माहिती आम्ही ह्या आर्टिकल मध्ये समजविण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आवाढल असेल, तरीही हयाबद्दल काहीही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला ते कमेन्ट करून कळवू शकता, धन्यवाद, जय महाराष्ट्र.

FAQs

  1. Q: Is 2023 is good time to invest in mutual funds in marathi ?

    Ans: खरतर, ज्या दिवशी तुम्ही गुंतवणूक करायचे ठरविता त्याच दिवसापासून गुंतवणूक करणे योग्य, पण जर २०२३ बद्दल बोलायचे तर तुम्ही SIP द्वारे दरमहिना गुंतवणूक करणे योग्य ठरेल, त्यामुळे मार्केट वर खाली मध्ये झाल्यावर तुमची चिंता वाढणार नाही आणि दीर्घकाळात चांगले रिटर्न्स मिळतील.

  2. Q: Is it right time to invest in mutual funds when market is high ?

    Ans: SIP द्वारे दरमहिना इन्वेस्ट करत असाल तर ते चांगले, पण एकदम खूप मोठी रक्कम एकाचवेळी इन्वेस्ट करत असाल तर ते चुकीच ठरले. टप्या टप्याने SIP द्वारे इन्वेस्ट केल्याने cost averaging चंगल्या रीतीने होते.

  3. Q: Right time to invest lumpsum in mutual funds in marathi ?

    Ans: जेव्हा मार्केट खाली जाते ती योग्य वेळ असते Lumpsum इणवेसटमेंट साठी, पण एकाचवेळी इन्वेस्ट करून नका, ते lumpsum पैसे ४ त ५ भागामध्ये विभाजित करा आणि मग इन्वेस्ट करा.

  4. Q: Is SIP a mutual fund in marathi ?

    Ans: नाही, SIP आणि म्यूचुअल मध्ये फरक आहे, SIP हा एक मार्ग आहे शेअर मार्केट मध्ये म्यूचुअल फंड द्वारे गुंतवणूक करण्याचा आणि म्यूचुअल फंड म्हणजे फंड ज्यामध्ये SIP ने गुंतवणूक करता येते.

  5. Q Mutual fund industry in India in regulated by in Marathi ?

    Ans: म्यूचुअल फंड इंडस्ट्री ही SEBI च्या under येते आणि SEBI एक प्रतिष्ठित नियामक आहे, SEBI ची शेअर मार्केट आणि म्यूचुअल फंड बद्दल खूप कडक नियमावली आहे, ह्या बद्दल अधिक माहिती साठी आमचा “स्टॉक ब्रोकर ची तक्रार SEBI कडे कशी करावी” हा आर्टिकल वाचू शकता.

हे पण वाचा :

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

ह्या Web Stories पण बघा, तुम्हाला नक्कीच आवढतील :

3 Comments

    1. धन्यवाद योगेश..! नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, अजून पुढेही वेगवेवळ्या मुद्यांवर माहिती मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PE Ratio म्हणजे काय ? SIP म्हणजे काय? SIP ने करोंडपती बनायचे आहे, ह्या चुका करू नका Benefits of investing in Mutual Funds 2023
PE Ratio म्हणजे काय ? SIP म्हणजे काय? SIP ने करोंडपती बनायचे आहे, ह्या चुका करू नका Benefits of investing in Mutual Funds 2023
रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर