२०२३ मध्ये स्मॉल कॅप फंड द्वारे Lumpsum गुंतवणूक का थांबवली जात आहे ? | Why Lumpsum investment stop by Small Cap funds in Marathi ?

Lumpsum investment stop news, Lumpsum investment stop from small cap funds in India, why mutual fund AMCs are declining fresh lumpsum investment, Small cap funds suspends lumpsum flow, Small cap fund stop accepting lumpsum money

Table of Contents

Introduction

जुलै २०२३ पासून काही म्यूचुअल फंड हाऊस स्मॉल-कॅप फंड मध्ये Lumpsum इन्वेस्टमेंट थांबवणार आहेत, काही इतर फंड्ज ने तर थांबवणे चालू ही केल आहे, लार्ज कॅप, मिड कॅप आणि इतर प्रकारच्या म्यूचुअल फंड मध्ये अजून तरी अशी घोषणा नाही केली, हे फक्त स्मॉल-कॅप म्यूचुअल फंड बद्दलच आहे, पण का स्मॉल-कॅप फंड मध्येच Lumpsum थांबवली जात आहे, जाणून घेऊया सविस्तर मध्ये.

स्मॉल-कॅप म्यूचुअल फंड मध्ये Lumpsum इन्वेस्टमेंट का थांबवत आहे | Why lumpsum investment stop in small cap funds in Marathi :

स्मॉल-कॅप कॅटेगरी मध्ये कमी भांडवल असलेल्या बिझनेस चा समावेश असतो, अशा कंपन्या ज्याची दीर्घकाळत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असते, पण रिस्क ही तेवठेच असते. शेअर मार्केट वर जाते तेव्हा स्मॉल-कॅप म्यूचुअल फंड मधून खूप जास्त रिटर्न मिळतात, त्यामुळे इन्वेस्टर ही जास्त पैसे ह्या कॅटेगरी मध्ये गुंतवू लागतात, पण जेव्हा शेअर मार्केट पडते तेव्हा स्मॉल-कॅप म्यूचुअल फंड मधून खूप नुकसान होतो आणि त्यामुळे इन्वेस्टर शेअर मार्केट मधून पैसा काढू लागतात आणि परत कधी शेअर मार्केट मध्ये इन्वेस्ट करण्याचे धाडस करत नाहीत.

२०२० च्या नंतर शेअर मार्केट खूप वर गेल्याने स्मॉल-कॅप म्यूचुअल फंड मधून खूप जास्त रिटर्न मिळाले आणि म्हणून ह्या मध्ये खूप पैसा येऊ लागला आहे, पण फंड मॅनेजर ह्या बाबतीत थोड काळजीत आहेत की नेहमीच जास्त रिटर्न्स मिळणार नाहीत, ह्या मधून लॉस ही होऊ शकतो आणि फंड मध्ये आलेला जास्त पैसा ही फंड मॅनेजर ला वैवस्तीत पणे इन्वेस्ट करणे थोडे कठीण जाईल, ही काही करणे बघता काही म्यूचुअल फंड हाऊस ने स्मॉल-कॅप म्यूचुअल फंड मध्ये नवीन Lumpsum इन्वेस्टमेंट थांबवली आहे.

स्मॉल-कॅप फंड मध्ये Lumpsum इन्वेस्टमेंट थांबवणे का महत्वाचे आहे :

रीटेल इन्वेस्टर म्हणजे तुमच्या आमच्या सारखे इन्वेस्टर साठी ही Lumpsum इन्वेस्टमेंट थांबवण्याची स्टेप खूप महत्वाची आहे, कारण जास्त करून कोणताही इन्वेस्टर हा शेअर मार्केट मध्ये कमी वेळात जास्त पैसे कामावण्यासाठी येतो, २०२० नंतर म्यूचुअल मध्ये स्मॉल-कॅप कॅटेगरी ने जास्त रिटर्न्स दिले आहेत, हे बघून बहुतेक रीटेल इन्वेस्टर ने स्मॉल-कॅप म्यूचुअल फंड मध्ये इन्वेस्ट करणे चालू केले आहे, पण जर इथून शेअर मार्केट पडल तर सगळ्यात जास्त लॉस ह्याच कॅटेगरी मध्ये होईल, हे रीटेल इन्वेस्टर ला माहीत नाही पण फंड मॅनेजरला हयाबद्दलच ज्ञान आहे, म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे आणि त्यामुळे स्मॉल-कॅप फंड मध्ये Lumpsum इन्वेस्टमेंट थांबवणे महत्वाचे आहे.

स्मॉल-कॅप फंड मध्ये Lumpsum इन्वेस्टमेंट थांबवणे कोणासाठी उपयुक्त ठरेल :

शेअर मार्केट मध्ये ९०% टक्के पेक्षा जास्त लोक रीटेल इन्वेस्टर आहेत आणि बाकीचे एक्स्पर्ट आहेत, जे एक्स्पर्ट आहेत ते शेअर मार्केट क्रॅश मध्ये फसत नाहीत, ते त्यातून मार्ग काढतात, पण फसतो तो फक्त रीटेल इन्वेस्टर. जस मी वरच्या पॉइंट वर सांगितल की स्मॉल कॅप म्यूचुअल फंड ही थोडी रिस्की कॅटेगरी आहे आणि जेव्हा मार्केट क्रॅश होते तेव्हा जास्त लॉस ह्याच कॅटेगरी मध्ये होतो आणि रीटेल इन्वेस्टर ह्यामध्ये फसला जातो, त्यामुळे स्मॉल-कॅप फंड मध्ये Lumpsum इन्वेस्टमेंट थांबवणे हा निर्णय रीटेल इन्वेस्टर साठी उपयुक्त ठरेल.

कोणत्या स्मॉल-कॅप फंड ने Lumpsum इन्वेस्टमेंट थांबवली आहे | Which small cap funds stop lumpsum till now in Marathi :

Nippon India Mutual fund ने जुलै २०२३ मध्ये, Hdfc Defence fund ने जून २०२३ आणि Tata Mutual Fund ने ह्या आधीच Lumpsum इन्वेस्टमेंट थांबवली आहे, जुलै २०२३ पर्यन्त, सध्यातरी ह्या ३ फंड ची नावे मिळाली आहेत, ह्या बद्दल अजून काही फंड लिस्ट मिळाली तर ती आम्ही लक्कीच तुमच्या बरोबर शेअर करू.

काय हे शेअर मार्केट क्रॅश होण्याचे संकेत आहेत :

आपल्याला असे वाटणे साहजिक आहे, जर lumpsum थांबवली तर शेअर मार्केट मध्ये येणार पैसा कमी होईल, मार्केट पडेल, वैगेरे, पण असे नाही आहे, कारण सगळी स्मॉल-कॅप कॅटेगरी मिळून सुद्धा ती संपूर्ण शेअर मार्केट मध्ये फक्त १५% चेच योगदान करते, म्हणून स्मॉल-कॅप मार्केट पडले तरी जास्त काही फरक नाही पडणार. bseindia च्या वेबसाइट नुसार भारताच्या शेअर मार्केट मध्ये जवळपास ५२०० कंपन्या आहेत, त्या संगळ्यांच मिळून market capitalization ३०८ लाख करोड आहे आणि फक्त टॉप १०० कंपणत्याचच market capitalization ३०३ लाख करोड आहे, म्हणून स्मॉल-कॅप कॅटेगरी मध्ये जरी काही झाले तर संपूर्ण शेअर मार्केट ला काहीच फरक पडणार नाही.

स्मॉल-कॅप म्यूचुअल फंड म्हणजे काय | What is small cap mutual fund in Marathi :

शेअर मार्केट मध्ये मार्केट कॅप नुसार सगळ्या कंपन्यांचे वर्गीकरण केले आहे, मार्केट कॅप नुसार ज्या टॉप १०० कंपन्या आहेत त्या लार्ज-कॅप मध्ये समाविष्ट होतात, त्यांचे मार्केट कॅप २०,००० करोड पेक्षा जास्त असते, त्यानंतर १०१ पासून २५० पर्यंतच्या कंपन्या मिड-कॅप कॅटेगरी मध्ये मोजल्या जातात, त्यांचे मार्केट कॅप हे ५,००० करोड ते २०,००० करोड ह्या दरम्यान असते आणि २५१ पासून नंतरच्या सगळ्या कंपन्या स्मॉल-कॅप मध्ये मोजल्या जातात, ह्या कंपन्यांच मार्केट कॅप हे ५,००० करोड पेक्षा कमी असते. जे म्यूचुअल फंड स्मॉल-कॅप कंपनीमध्ये इन्वेस्ट करतात त्याला स्मॉल-कॅप म्यूचुअल फंड म्हणतात.

स्मॉल-कॅप म्यूचुअल फंड मध्ये कोणी इन्वेस्ट केले पाहिजे :

सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुमचा गुंतावुकीणेचा कालावधी १० वर्षापेक्षा जास्त असेल तर काळ असेल तरच तुम्ही स्मॉल कप मध्ये इन्वेस्ट केले पाहिजे, कारण शॉर्ट टर्म मध्ये जर शेअर मार्केट पडला तर सर्वात आधी स्मॉल कॅप फंड किंव्हा स्मॉल कॅप शेअर्स पडतात आणि तुम्ही घाबरू शकता आणि लॉस मध्येच पैशे काढून घेऊ शकता, जर तुम्ही गुंतवलेले पैसे ५०% खाली आले तरी तुमची चिंता वाढणार नाही, तरच तुम्ही स्मॉल कॅप मध्ये इन्वेस्ट केले पाहिजे.

स्मॉल कॅप मध्ये इन्वेस्ट करण्याआधी आपला रिस्क प्रोफाइल काय आहे हे माहीत असणे खूप गरजेचे आहे, रिस्क प्रोफाइल मुख्यतः तीन प्रकारचे असतात, Conservative, Moderate आणि Aggressive.

Conservative कॅटेगरी म्हणजे कमी रिस्क घेणे, ३०% इक्विटि शेअर मार्केट आणि ७०% डेब्ट मार्केट.
Moderate म्हणजे ५०% रिस्क घेणे, म्हणजे ५०% इक्विटि शेअर मार्केट आणि ५०% डेब्ट मार्केट.
Aggressive म्हणजे थोड जास्त रिस्क घेणे, ९०% किंव्हा १००% इक्विटि शेअर मार्केट मध्ये इन्वेस्ट करणे.

काही प्रसिद्ध वेबसाइट वर जाऊन आपण आपला रिस्क प्रोफाइल चेक करू शकतो, काही लिंक मी खाली दिले आहेत.

https://www.miraeassetmf.co.in/riskprofile
https://moneycontrol/riskcheck

Lumpsum इन्वेस्टमेंट म्हणजे काय | What is Lumpsum investment in Marathi :

Lumpsum इन्वेस्टमेंट म्हणजे एक रक्कमेने एकत्रितपणे पैसा कोणत्याही financial instrument मध्ये गुंतवणे, जसे की म्यूचुअल फंड, FD, वैगेरे. हे SIP च्या एकदम विरुद्ध आहे, कोणतीही इन्वेस्टमेंट एक ठराविक टाइम मध्ये गुंतवत असाल मग ती छोटी रक्कम असो वा मोठी ती SIP म्हणूनच ओळखली जाते. Lumpsum इन्वेस्टमेंट ही आपण मध्येच कधीही करु शकतो, समझा कधी बोनस झाला किंव्हा कधी अचानक पैसे आले की आपण ती टॉप अप सारखी इन्वेस्ट करू शकतो, Lumpsum चा सर्वात जास्त फायदा जेव्हा मार्केट खूप खाली येत तेव्हा होतो.

Lumpsum vs SIP कोणता पर्याय चांगला आहे | Lumpsum vs SIP, which is better in Marathi :

दोन्हीही पर्याय चांगले आहेत, दोघांचेही वेगवेगळे महत्व आहे. SIP ही मार्केट च्या चढ उतरामद्धे तुम्हाला फायदे देते, मार्केट वर जास्त लक्ष देण्याची गरज नसते, कमी पैसे असले तरी चालतात, आपल्याला पैशाची बचत करण्याची सवय लागते, वैगेरे. त्याऐवजी Lumpsum मुळे तुमच्या इन्वेस्टमेंट ला भर मिळते, तुमचे गोल वेळेआधी पूर्ण होतात, अचानक मार्केट पडले तर त्याचा फायदा घेत येतो, वैगेरे. त्यामुळे दोन्हीही पर्याय महत्वाचे आहेत.

Conclusion

मी आशा करितो की तुम्हाला ह्या मधून समजले असेल की Lumpsum इन्वेस्टमेंट का थांबवली आहे आणि ती थांबवणे का महत्वाचे आहे, त्या याबद्दल तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल किंव्हा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता.

FAQs

  1. Q: Lumpsum इणवेसटमेंट कधी करावी | When to invest lumpsum amount in Mutual Fund in Marathi ?

    Ans: Lumpsum इन्वेस्टमेंट ही शक्यतो जेव्हा आपला बोनस होतो किंव्हा अचानक काही पैसे मिळाले तर तेव्हा करावी, पण जेव्हा शेअर मार्केट जास्त खाली जाते तेव्हा Lumpsum इन्वेस्टमेंट करणे योग्य ठरेल.

  2. Q: स्मॉल कॅप मध्ये किती पैसे गुंतवले पाहिजे | How much should I invest in small cap fund in Marathi ?

    Ans: जर तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकत नसाल आणि रिस्क घ्यायची पात्रता कमी असेल तर, तुम्ही साधारणपणे तुमच्या पूर्ण पोर्टफोलियो च्या १०% ते १५% टक्के इन्वेस्ट केले पाहिजे.

हे पण वाचा :

ह्या Web Stories पण बघा, तुम्हाला नक्कीच आवढतील :

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PE Ratio म्हणजे काय ? डिजिटल रूपी म्हणजे काय ? SIP म्हणजे काय?
PE Ratio म्हणजे काय ? डिजिटल रूपी म्हणजे काय ? SIP म्हणजे काय?
रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर