महागाई म्हणजे काय, सोप्या भाषेत समझा | Inflation meaning in Marathi

What is inflation in marathi, Inflation rate meaning in marathi, Inflation meaning marathi, meaning of inflation in marathi, Inflation marathi meaning, What is inflation in India, inflation definition in marathi, what is simple definition of inflation, meaning of inflation, Inflation vs salary, why inflation happen, India Inflation

सुरुवात :

महागाई कोणालाच नाही आवाढत, महागाई दिवसेंदिवस वाढतच जाते, आज ऑगस्ट २०२३ मध्ये टोमॅटो चे भाव किती आहेत ते संगळ्याना माहीतच आहेत, कमीत कमी १०० रुपये किलो, ही महागाई नेहमी वाढतच असते, कधी टोमॅटो तर कधी कांदा आणि कधी डाळीचे भाव वाढतात. पण ही महागाई कोण वाढवतो, का वाढवतो, महागाई कमी होऊ शकते का, महागाई वाढालीच नाही तर काय होईल, हे सगळे प्रश आज आपण ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.

महागाई म्हणजे काय | What is Inflation in Marathi :

महागाई म्हणजे वस्तूंची आणि सेवांची किंमत वाढणे, महागाई मुळे पैशाचे मूल्य कमी होत जाते, म्हणजे १९५८ मध्ये जे १ रुपयाला मिळत होते ते २०२३ मध्ये १०० रूपयाला मिळते. काही कंपन्या वस्तूंची किंमत वाढत नाही पण त्यांचे प्रमाण कमी करतात, ह्याला Shrinkflation म्हणतात, पण हेही एक महागाई वाढीचेच उदाहरण आहे, जसे कॅडबरी आणि चिप्स विकणाऱ्या कंपन्या करतात.

महागाई का वाढत असते | Reasons of Inflation in marathi :

महागाई का वाढत असते कधी विचार केला आहे का, कोण वाढवत असते महागाई, सरकार वाढवते का ?, का कोणता राजकीय पक्ष वाढवतो, असे काहीच नसते, महागाई वाढण्यामागे अनेक कारणे आहेत पण आपण काही महत्वाची कारणे बघूयात.

  • लोकांची वाढती मागणी: एखाद्या वस्तूची अचानक लोकांकडून मागणी वाढली की विक्रेता त्या वस्तूची किंमत वाढवतो, उदाहरण म्हणून गावी जाणाऱ्या बस आणि रेल्वेचे घेऊया, नेहमी गावी जाणाऱ्या बसच्या तिकीटांची किंमत कमी असते पण गणपती मध्ये आपण गावी जातो तेव्हा त्याची टिकिट २ ते ३ पटीने जास्त होते, अशा मागण्या वाढल्या की महागाई पण वाढते.
  • पेट्रोलच्या किंमती वाढणे: पेट्रोल च्या किंमती वाढल्या की महागाई वाढते, कारण वाहतुकी साठी पेट्रोल लागते, म्हणून पेट्रोल महाग झाले की महागाई वाढते, पण पेट्रोल महाग का होते ?, पेट्रोल हे भारताला अमेरिका, सौदी अरेबिया, रशिया, ह्या देशांकडून घ्यावे लागते आणि आंतरराष्ट्रीय देशात पेट्रोलची किंमत वाढली की भारतलाही आपल्या देशात पेट्रोल च्या किंमती वाढवाव्या लागतात, त्यामुळे महागाई वाढते.
  • लोन वरील व्याज कमी होणे: बँकेच्या लोन चे व्याज कमी झाले तरीही महागाई वाढते, कारण जर बँकेने व्याज कमी केले की माणसे लोन घेऊ लागतात, जास्त खर्च करू लागतात, अशाने मार्केट मध्ये मागणी वाढू लागते आणि मागणी वाढली की वस्तूंच्या किंमतीही वाढू लागतात, अशाप्रकारे लोन वरील व्याज दर कमी झाला तरी महागाई वाढते.

महागाई कोणी कमी करू शकतो का | measures to control inflation in marathi :

महागाई कमी नाही पण त्यावर नियंत्रण ठेवता येते, प्रतेक देशाला त्याच्या महागाई वर नियंत्रण ठेवावे लागते, प्रतेक देशाने महागाईची एक सीमा ठरवली आहे, आपल्या भारताच्या महागाई ची सीमा ४% ते ६% पर्यंत आहे, तर अमेरिका किंव्हा इतर देशाची २% आहे. प्रतेक देशाची सेंट्रल बँक हे करत असते, भारताची सेंट्रल बँक RBI महगाईवर नियंत्रण ठेवत असते.

RBI महागाई वर नितंत्रण कसे ठेवत असते | How RBI control inflation through Repo Rate in marathi :

लोन वरील व्याज दर कमी झाले तर महागाई वाढते, तसेच व्याज जास्त झाले की महागाई कमी पण होते, कारण जर व्याज दर वाढले की माणसे लोन कमी घेतात, खर्च कमी करतात, मग मागणी कमी झाली की किंमती पण कमी होतात, अशाप्रकारे RBI लोन वरील व्याज Repo Rate द्वारे कमी किंव्हा जास्त करून महागाई वर नियंत्रण ठेवत असते, Repo Rate म्हणजे RBI चा मुख्य व्याज दर, ज्या रेट वर आधारित सर्व बँक त्यांच्या लोन वरील व्याज दर ठरवत असतात.

महागाई वाढलीच नाही तर काय होईल | What if there is no inflation in marathi :

महागाई वाढली नाही तर किती बरे होईल असे आपल्याला वाटते, पण तसे नसते, महागाई वाढली नाही तर आपला पगार ही वाढणार नाही, बाजारात कोणतीच स्पर्धा राहणार नाही, म्हणजे आता ज्या आपल्याकडे टेक्नॉलजी आहेत त्या कोणी निर्माणच करणार नाही. उदाहरण – बाजारात नवीन मोबईल येणार नाहीत, नवीन गाड्या येणार नाही.

महागाई खूपच कमी झाली तर काय होईल :

महागाई खूपच कमी होणे म्हणजे वस्तूंच्या किंमती कमी होणे, आणि किंमती कमी झाल्या तर कंपन्यांना नफा होणार नाही, ज्यामुळे तुमचा पगार कमी होईल, तुम्ही आवश्यक गोष्टी घेऊ शकणार नाही, कोणाचीच प्रगती होणार नाही, त्यामुळे महागाई कमी होणे हे ही चांगले नाही आहे.

महागाई चंगली आहे की वाईट | Is inflation good or bad in marathi :

महागाई काही प्रमाणात वाढणे हे आपल्यासाठी खूप चांगले आहे, पण ती एका ठराविक प्रमाणातच वाढली पाहिजे जे प्रमाण RBI ने ठरवले आहे (४% ते ६%). ह्या प्रमाणात वाढली तर तुमचा पगार ही वाढेल, तुम्ही नवीन खरेदी कराल, नवीन मागणी वाढेल, मागणी वाढली की नवीन टेक्नॉलजी चा निर्माण होतो आणि अशाने सगळ्यांची भरभराट होते, त्यामुळे महागाई संतुलित असणे म्हणजे काही प्रमाणात वाढणे चांगले आहे, खूप जास्त आणि खूप कमी पण नको.

महागाईला आपण हरवू शकतो का | How to beat inflation in marathi :

महागाईला आपण नक्कीच हरवू शकतो, महागाई ला हरवण्यासाठी आपल्याला शेअर मार्केट मध्ये इन्वेस्ट केले पाहिजे, कारण शेअर मार्केट मधुन आपल्याला दीर्घकाळामध्ये महागाई पेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात (म्हणजे १२%). टेच आपल्याला बँकेच्या बचत खात्यामधून ३%, FD मधुन इन्कम टॅक्स दिल्यानंतर ६%, व्याज मिळते, ज्याने महागाईला हरवू शकत नाही. ह्या खालील फोटो मध्ये शेअर मार्केट कसे महागाईला हरवतो त्याचे उदाहरण आहे.

How to beat inflation in marathi
महागाई

महागाईमुळे किती पगारवाढ होऊ शकते | How to calculate salary based on Inflation in marathi :

महागाई किती वाढली हे आपण CPI Index ने चेक करू शकतो, CPI म्हणजे Consumer Price Index, म्हणजे रोजच्या लागणाऱ्या वस्तूंची किंमत सरासरीने किती % वाढली, ह्याने आपल्याला दर महिन्याला किती % ने महागाई वाढली हे कळते, त्याप्रमाणे तुम्ही तुमचा पगार वाढ व्हावा अशी मागणी करू शकता.

महागाई वाढली आहे हे कसे ओळखले जाते | How to measure inflation in marathi :

अर्थशास्त्रज्ञ किंव्हा वित्त तज्ञ काही मजेदार पर्यायाने महागाई वाढण्याचा अंदाज घेतात, तो म्हणजे Underwear & Lipstick method. Underwear & Lipstick ची विक्री कमी झाली की महागाई वाढली असे समजतात, कारण Underwear & Lipstick ह्या मूलभूत गरजा नाहीत, त्यामुळे महागाई वाढली की ह्याची खरेदी कोणी करत नाहीत, म्हणून जर विक्री कमी झाली की महागाई वाढली असा अंदाज लावला जातो.

महागाईचा शेअर मार्केट वर काय परिणाम होतो | Effect of Inflation on stock market in marathi :

महागाई वाढली की ती नियंत्रित ठेवण्यासाठी RBI ला Repo Rate वाढवायला लागतो, रेपो रेट वाढले की सर्व लोन चे व्याज वाढतात, व्याज वाढले की लोणकांकडून लोन घेणे कमी होते, लोकांकडे पैसे नसतात आणि ते खर्च कमी करतात, त्यामुळे कंपन्यांची विक्री कमी होते आणि त्यांचा नफा कमी होतो, नफा कमी झाला की शेअरची किंमत पण कमी होते, अशाप्रकारे महागाईचा शेअर मार्केटवर परिणाम होतो.

निष्कर्ष :

मी आशा करतो की महागाई वरील सगळी माहिती तुम्हाला सोप्या भाषेत मिळाली असेल, एका मर्यादित सीमेमध्ये महगाई असणे का महत्वाचे आहे ते तुम्हाला कळले असेल, तुमचे ह्या बद्दल आणखी काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा.

FAQs

  1. Q: What is main cause of Inflation in marathi ?

    Ans: महागाईचे मुख्य कारण आहे लोकांच्या हातात जास्त पैसे येणे, कारण जास्त पैसे आले की लोक जास्त खर्च करू लागतात आणि जास्त मागणी वाढते, त्यामुळे महागाई वाढते.

  2. Q: Who benefits from Inflation in marathi ?

    Ans: महागाई वाढल्याचा फायदा जाच्याकडे जास्त पैसे आहेत त्याला होतो, महागाई वाढली की लोन वर व्याज ही वाढते, म्हणजे लोन देणाऱ्याला महागाई वाढली की फायदा होतो.

हे पण वाचा :

ह्या Web Stories पण बघा, तुम्हाला नक्कीच आवढतील :

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Synopsis of Rich Dad Poor Dad in Marathi Psychology of Money book मराठी मध्ये समजून घ्या How to become successful investor in Marathi SIP ने करोंडपती बनायचे आहे, ह्या चुका करू नका
Synopsis of Rich Dad Poor Dad in Marathi Psychology of Money book मराठी मध्ये समजून घ्या How to become successful investor in Marathi SIP ने करोंडपती बनायचे आहे, ह्या चुका करू नका
रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर