Financial Freedom म्हणजे काय आणि ते कसे मिळवावे | Financial Freedom meaning in Marathi

Financial freedom vs independence in marathi, meaning of financial freedom in Marathi, Why financial freedom is important, what does financial freedom mean to you, what are the steps to financial freedom in marathi, how to achieve financial freedom in marathi, How much money needed for financial independence, 15 August, Independence Day 2023,

सुरुवात :

भारताला १९४७ सालीच स्वातंत्र्य मिळाले, पण भारतीय नागरिक आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य आहेत का , World bank च्या सर्वेनुसार १% भारतीयांकडे ८ लाख रुपयांची बचत आहे, Credit Suisse च्या २०२१ च्या ग्लोबल वेल्थ रीपोर्ट नुसार 0.७% भारतीयांकडे ८ करोड रुपयांची संपत्ति आहे आणि The Hurun India Rich List 2022 नुसार १४० करोड भारतीयांपैकी फक्त १००० भारतीयांकडेच १ करोड पेक्षा जास्त संपत्ति आहे. ह्यावरून असे कळते की भारतामध्ये खूप क्वचितच लोक आहेत जे आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य आहेत.

Financial freedom म्हणजे काय | What is Finance freedom in Marathi :

Financial freedom ला मराठी मध्ये आर्थिक स्वातंत्र्य असे म्हणतात आणि आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुमचे जीवन जगन्यासाठी लागणारे पैसे कमवण्याच्या काळजीपासून मुक्त होणे. याचा अर्थ तुमच्याकडे एवढा पैसा असणे की ज्याने तुमचा महिन्याचा खर्च, गरजा आणि इच्छा सजरीत्या पूर्ण होणे, आर्थिक स्वातंत्रमुळे तुम्हाला हवे ते करण्याचे स्वातंत्र्य आणि पुरेसा वेळ मिळू शकतो.

भारतीय आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र का नाही आहेत ? :

भारतीयांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र न होण्यामागे अनेक कारणे आहेत. यातील काही सर्वात सामान्य कारणे आहेत:

१. कमी उत्पन्न: भारतीय उत्पन्नाचा सरासरी स्तर खूप कमी आहे. यामुळे बचत करणे आणि संपत्ती निर्माण करणे कठीण होते.
२. उच्च कर्ज पातळी: अनेक भारतीय उच्च कर्ज घेऊन त्रासलेले आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या पुढे जाणे कठीण होऊ शकते.
३. आर्थिक शिक्षणाचा अभाव: अनेक भारतीयांना मूलभूत आर्थिक शिक्षणाचा अभाव आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या योग्य (sound financial) निर्णय घेणे कठीण होते.
४. सांस्कृतिक घटक: काही सांस्कृतिक घटक देखील भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यात अडथळा आणू शकतात. उदाहरणार्थ, मोठ्या खरेदीसाठी, जसे लग्न आणि घरे, ह्यासारख्या गोष्टींसाठी पैसे वाचवून ठेवणे ह्यावर जास्त जोर असणे. यामुळे निवृत्ती (रिटायरमेंट) किंवा इतर दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी बचत करणे कठीण होऊ शकते.

Financial freedom कसे मिळवावे :

आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे कठीण असू शकते, परंतु ते साध्य करणे शक्य आहे. आर्थिक स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा उद्देश आहे जो प्रत्येकाने साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता:

स्टेप १ – (Financial Goal) आपले आर्थिक ध्येय निश्चित करा :

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या आर्थिक ध्येयाची एक यादी बनवावी लागेल, उदाहरणार्थ, (रिटायरमेंट ध्येय) निवृत्ती, मुलांच्या शिक्षणासाठी बचत, मुलांचे लग्न, स्वतचे घर, वैगेरे, ह्यासाठी किती पैसे हवे आहेत ते समजून घ्या आणि त्यामध्ये महागाई दराचा (Inflation rate) नक्कीच विचार करा, जेणेकरून महागाई दराने किती पैसे लागतील ह्याचा अंदाज येईल, जर तुम्हाला काय हवे ते माहीत असेल, तरच तुम्ही ते साध्य करण्यासाठी एक योजना बवनू शकता आणि ते पूर्ण करू शकता.

स्टेप २ – तुमचा बजेट तयार करा :

आर्थिक ध्येय तयार केल्यानंतर तुमचे बजेट काय आहे ते तयार करा, बजेट म्हणजे तुमचं इन्कम किती आहे, खर्च किती आहे आणि बचत किती आहे हे माहीत असणे, सर्वात महत्वाचे म्हणजे बचत केलेले पैसे तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवले पाहिजे, कारण आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर पैशाची गुंतवणूक करणे खूप महत्वाचे आहे. बचत केलेले पैसे जर तुम्ही बचत खात्यामध्ये ठेवत असाल तर ती खूप मोठी चूक ठरेल, कारण बचत खात्यामध्ये महागाई पेक्षा कमी व्याज मिळते, त्यामुळे तुमचे पैसे वाढणार नाही आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास अडथळे येतील.

स्टेप ३ – आर्थिक संकटांची काळजी घेणे (Risk Management) :

आर्थिक संकटे म्हणजे अचानक तुमच्या कुटुंबावर काही वाईट वेळ येणे, देव न करो पण उद्या तुम्ही ह्या जगात नसलात किंव्हा कोणता मोठा आजार झाला तर तुमच्या कुटुंबाचे पुढे काय होईल ह्या सगळ्याची आधीच काळजी घेणे, त्यासाठी तुमच्याकडे एक पुरेसा जीवन विमा (लाइफ इन्शुरेंस) आणि आरोग्य विमा (Health Insurance) असणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाकडे त्यांच्या रोजच्या खर्चाचे पैसे असतील आणि ते पुढील आयुष्य सुरुळीत जगतील.

स्टेप ४ – आपत्कालीन निधी तयार करणे (Emergency fund) :

देव न करो पण कधी तुमच्या पैसे कमविण्याचा मार्गामध्ये अडचण आली, म्हणजे नोकरी करत असाल तर नोकरी बंद झाली तर नवीन नोकरी मिळेपर्यंत तुमच्या कुटुंबाचा खर्च व्यवस्थितपणे चालला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला आपत्कालीन निधी तयार करणे अत्यंत आवशक्य आहे, आपत्कालीन निधी हा तुमच्या महिन्याच्या खर्चाच्या सहा पट एवढा असला पाहिजे जर तुम्ही नोकरी करत असाल आणि जर तुम्ही बिझनेस करत असाल तर महिन्याचा खर्चाच्या १२ पट इतका असला पाहिजे. आपत्कालीन निधी तुम्ही FD किंव्हा लिक्विड म्यूचुअल फंड मध्ये ठेवू शकता.

स्टेप ५ – कर्जातुन मुक्त होणे :

आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कर्ज मुक्त असणे खूप गरजेचे आहे, कारण कर्ज नसेल तरच तुम्हाला शांत झोप लागेल आणि मन शांत असेल. आम्ही असे नाही म्हणत की कर्ज घेऊ नका, कर्ज घ्या पण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर कर्जातुन मुक्त व्हा, जेणेकरून तुमच्याकडील पैशाची बचत व्हायला सुरुवात होईल, तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात कराल, तुमचे पैसे वाढू लागतील आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य व्हाल.

स्टेप ६ – भविष्यासाठी गुणवणूक करणे :

गुंतवणूक तुमच्या पैशाला वेळेनुसार वाढण्यास मदत करू शकते आणि तुमच्या आर्थिक ध्येय साध्य होण्यास मदत करू शकते. अनेक वेगवेगळे गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत पण सगळ्यात सोपा आणि सरळ पर्याय म्हणजे SIP द्वारे म्यूचुअल फंड मध्ये इन्वेस्ट करणे, SIP मुळे तुम्हाला जास्त भार येणार नाही, नेहमी गुंतवणूक करण्याची सवय लागेल, वैगेरे. म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, ह्या बद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचा “म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे” हा आर्टिकल वाचू शकता.

स्टेप ७ – आर्थिक सल्लागारची मदत घ्या :

जर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवावे याची माहिती नसेल तर तुम्ही आर्थिक सल्लागार ची मदत घेऊ शकता, आर्थिक तज्ञ तुम्हाला तुमचं आर्थिक प्लान आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मदत करेल किंव्हा आमच्या ह्या वेबसाईट वरुण सोप्या भाषेत शिकू शकता.

Financial freedom चे फायदे | Benefits of finance freedom in Marathi :

१. हवे ते काम करण्याचे स्वातंत्र्य: आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अटींवर काम करण्याची परवानगी देते. तुम्हाला कोणत्याही नियोक्ता किंवा वरिष्ठांचा आदेश न घेता तुमचे काम आणि तुमचे आयुष्य कसे जगावे याचा निर्णय घेता येतो.

२. स्वतच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा आनंद: आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या आवडींनुसार जगण्याची परवानगी देते. तुम्ही तुमच्या पैशाचा वापर तुमच्या आवडीनिवडींवर करू शकता, जसे की प्रवास करणे, वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे आणि निसर्गाचा आनंद घेणे.

३. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ: आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला तणावमुक्त जीवन जगण्याची परवानगी देते. तुम्हाला पैशाची चिंता नसते आणि तुम्ही तुमचे जीवन आनंदाने आणि शांततेने जगू शकता, मनाची शांती मिळण्याने शारीरिक स्वास्थ ही उत्तम असते.

४. सुरक्षित भविष्य: आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी सुरक्षिततेची भावना देते. तुम्हाला माहित आहे की तुमच्याकडे पैसा आहे आणि तुम्ही तुमच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करू शकता.

५. कौटुंबिक सुख: आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना मदत करण्याची परवानगी देते. तुम्ही त्यांना आर्थिक सहाय्य करू शकता आणि त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करू शकता.

भारताचे स्वातंत्र्य आणि नागरिकांचे आर्थिक स्वातंत्र्य | Financial freedom vs India’s Independence in Marathi :

आर्थिक स्वातंत्र्य आणि भारताचा स्वातंत्र्यलढा या दोघांमध्ये काही समानता आहेत. दोन्हीसाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि बलिदान आवश्यक आहे. दोन्हीसाठी एक योजना आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत. आणि दोन्ही साध्य केले जाऊ शकतात.भारताचा स्वातंत्र्यलढा एक राष्ट्रीय उद्दिष्ट होता, तर आर्थिक स्वातंत्र्य एक वैयक्तिक उद्दिष्ट आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा पूर्णपणे साध्य झाला आहे, परंतु आर्थिक स्वातंत्र्य पूर्णपणे साध्य झालेला नाही. आर्थिक स्वातंत्र्य ही एक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे, परंतु ते साध्य करणे शक्य आहे. जर भारतीय आर्थिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष करू लागले, तर ते निश्चितच ते साध्य करू शकतात. आर्थिक स्वातंत्र्य हे भारताला समृद्ध आणि सशक्त देश बनवण्यास मदत करेल.

निष्कर्ष :

मी आशा करतो की तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याचे महत्व समजले असेल, आर्थिक स्वातंत्र्य मिळवल्यावर किती फायदा होते, त्यामुळे तुम्ही तुमचे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची वाटचाल लवकरच सुरू केली पाहिजे, जेणेकरून ते लवकर साध्य करणेही शक्य होईल, तुमचे हा विषयी काही प्रश्न असतील किंव्हा काही सल्ले असतील तर ते नक्कीच आम्हाला कमेन्ट बॉक्स मधून कळवा, आम्ही ते सोडवण्याचा आवडीने प्रयत्न करू, धन्यवाद, वंदे मातरम.

FAQs

  1. Q: What gives financial freedom in marathi ?

    Ans: Financial freedom मुळे तुम्ही पैसे कमवण्याच्या काळजी पासून स्वातंत्र्य होता, तुम्हाला मनाची शांतता मिळते, सुखी जीवन जगू शकता.

  2. Q: How much money require to achieve financial freedom in marathi ?

    Ans: हे सर्वतः तुमच्या गरजा, खर्च आणि इच्छेवर अवलंबून आहे, ह्या सगळ्यांचा खर्च मिळून जेवढा पैसा लागेल त्या पैशामद्धे तुम्ही तुमचे आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता.

हे पण वाचा :

ह्या Web Stories पण बघा, तुम्हाला नक्कीच आवढतील :

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

How to become successful investor in Marathi SIP ने करोंडपती बनायचे आहे, ह्या चुका करू नका SIP म्हणजे काय? स्टॉक ब्रोकर ची तक्रार SEBI कडे कशी करावी.
How to become successful investor in Marathi SIP ने करोंडपती बनायचे आहे, ह्या चुका करू नका SIP म्हणजे काय? स्टॉक ब्रोकर ची तक्रार SEBI कडे कशी करावी.
रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर