१५ मिनिटात, सर्वोत्तम म्यूचुअल फंड कसा निवडावा | How to choose best mutual fund in 2023 in marathi

how do I choose best mutual fund in marathi, How to select best mutual fund in India, Best mutual fund to invest in India in marathi, How to choose best mutual fund for beginner in marathi, Mutual fund selection criteria in marathi, How to choose best mutual fund for SIP in marathi, Mutual fund selection tool in marathi, जबरदस्त रिटर्न्स देणारे म्यूचुअल फंड कसे निवडायचे, सर्वोत्तम SIP म्यूचुअल फंड कसा निवडायचा, Which mutual fund is best for next 5 years in marathi.

Table of Contents

सुरुवात :

काहीही काम न करता जर करोडो रुपये कामवायचे असतील तर ते म्यूचुअल फंड मध्येच शक्य आहे, पण तुम्हाला त्यासाठी दीर्घकाळ SIP द्वारे गुंतवणूक करावी लागेल, पण कोणत्या म्यूचुअल फंड मध्ये चांगले रिटर्न्स मिळतात हे कसे समजणार, तेच आपण ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत, पण ह्यामध्ये फक्त इक्विटि म्यूचुअल फंड जे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात ते कसे निवडायचे ते बघूया, कारण इतर म्यूचुअल फंड जसे डेब्ट म्यूचुअल किंव्हा इंडेक्स म्यूचुअल फंड निवडण्याची पद्धत वेगळी आहे.

सर्वोत्तम म्यूचुअल फंड कसा निवडावा स्टेप बाय स्टेप बघूया | Steps to choose best mutual fund in marathi :

भारतामध्ये ४० पेक्षा जास्त म्यूचुअल फंड कंपन्या आहेत आणि त्यांचे २००० पेक्षा जास्त म्यूचुअल फंड स्कीम आहेत, आशामद्धे सर्वात चांगला म्यूचुअल फंड निवडायचा कसा, ज्यामध्ये जास्त रिटर्न्स मिळतील, हे स्टेप बाय स्टेप बघूया.

स्टेप १ – प्रथम तुमची आर्थिक ध्येय काय आहेत ते जाणून घ्या :

  • कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुमची आर्थिक ध्येय काय आहेत ते जाणून घ्या, म्हणजे रिटायरमेंट, मुलांचे शिक्षण, लग्न वैगेरे, ह्यासाठी किती पैसे हवे आहेत ते समजून घ्या, समजून न घेता कोणत्याही फंड मध्ये गुंतवणूक करू नये, प्रत्येक म्यूचुअल फंड चे प्रकार वेगवेगळे आहेत आणि त्याचे रिटर्न्स कालावधीप्रमाणे वेगवेगळे असतात.
  • तुमच्या आर्थिक ध्येयाची एक याधी बनवा, त्यामुळे किती वर्ष पैसे गुंतवायचे याचा तुम्हाला अंदाज येईल, “आर्थिक ध्येयाप्रमाणे गुंतवणूक कशी करायची” ह्या आर्टिकल मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

स्टेप २ – कोणत्या प्रकारच्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करायची आहे ते जाणून घ्या :

  • म्यूचुअल फंड अनेक प्रकारचे असतात, डेब्ट, इक्विटि, हायब्रिड, वैगेरे, तुम्हाला तुमच्या कालावधी प्रमाणे कोणत्या प्रकारच्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करायची आहे ते जाणून घ्या.
  • हायब्रिड म्यूचुअल फंड मध्ये ३ ते ५ वर्षामध्ये चांगले रिटर्न्स मिळतात, लार्ज कॅप फंड मध्ये ५ ते ७ वर्षामध्ये चांगले रिटर्न्स मिळतात, फ्लेक्सि कॅप मध्ये ७ ते १० वर्षामध्ये चांगले रिटर्न्स मिळतात आणि मिड किंव्हा स्मॉल कॅप मध्ये १० वर्षानंतर चांगले रिटर्न्स मिळतात.
  • त्यामुळे तुमच्या ध्येयाप्रमाणे किती वर्षानंतर पैसे हवे आहेत हे समजल्यावर, म्यूचुअल फंड चा प्रकार निवडा.

स्टेप ३ – म्यूचुअल फंड ची कामगिरी (performance) चेक करा :

  • कोणत्या प्रकारच्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करायची आहे ह्याचा निर्णय झाल्यावर त्या प्रकरमधील सर्व फंड्ज ची कामगिरी (performance) चेक करा.
  • कोणत्या फंड ने गेल्या ५ वर्षामध्ये चांगले रिटर्न दिलेत, कोणता फंड सतत काही वर्षे टॉप १० म्यूचुअल फंडच्या लिस्ट मध्ये आहे, कोणत्या फंड चे रिटर्न्स कॅटेगरी रिटर्न्स च्या सरासरी पेक्षा जास्त आहेत, बेंचमार्क पेक्षा जास्त रिटर्न्स आहेत का ते चेक करा.
  • मार्केट मध्ये मंदी असते तेव्हा कोणता फंड खाली येत नाही ते चेक करा, जेणेकरून तुमचे पैसे सुरक्षित राहितील.
  • हे तुम्ही Value research, Ticker Tape, Money Control, Yadnya Investment Academy, ह्या वेबसाइट वर जाऊन चेक करू शकता.

स्टेप ४ – म्यूचुअल फंड बद्दल संपूर्ण माहिती मिळवा :

  • म्यूचुअल फंड बद्दल सगळी माहिती मिळवा, कोणता फंड जास्त वर्षापासून कार्यरत आहे, फंड कडे एकूण किती रक्कम आहे (check fund size), कोणत्या फंडचा रेकॉर्ड चांगला आहे, कोणत्या कंपनीच्या फंडचे नाव मार्केट मध्ये चांगले आहे, वैगेरे.
  • शक्यतो कोणत्याही बँकेचा म्यूचुअल फंड चांगला असतो, कारण त्या म्यूचुअल फंडला बँकचा सपोर्ट असतो.
  • फंडची उदिष्टे काय आहेत ते चेक करा आणि ती तुमच्या ध्येयाशी जुळत आहेत की नाही ते चेक करा.

स्टेप ५ – म्यूचुअल फंड चा फंड मॅनेजर कोण आहे ते चेक करा :

  • फंड चा मॅनेजर कोण आहे ते चेक करा आणि त्याची संपूर्ण माहिती मिळवा, त्याचा रेकॉर्ड काय आहे, त्याचे शिक्षण किती आहे, फंड मॅनेजर सुरुवातीपासून काम करतो आहे का की मध्येच बदलला जातो ते चेक करा, जर बदलला असेल म्हणजे रिटर्न्स जुन्या फंड मॅनेजर मुळे मिळाले असे समजून येते.
  • फंड मॅनेजर आणखी कोणकोणते म्यूचुअल फंड हाताळतो ते चेक करा, बाकीच्या म्यूचुअल फंड मध्ये त्याने किती रिटर्न्स मिळवून दिलेत, कारण एका फंड मध्ये चांगले रिटर्न्स आणि दुसऱ्या फंड कमी म्हणजे तो फंड मॅनेजर तेवढा हुशार नाही आहे.
  • कोणत्याही म्यूचुअल फंड चा फंड मॅनेजर हा खूप महत्वाचा घटक असतो, कारण त्या फंड ने कुठे गुंतवणूक करायची आणि कुठे नाही, कोणता शेअर विकायचा आणि कोणता खरेदी करायचा, हे सर्व त्या फंड मॅनेजर वर अवलंबून असते.

स्टेप ६ – म्यूचुअल फंड ने कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली आहे ते चेक करा :

  • फंड ने कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली आहे ते चेक करा, टॉप १० शेअर्स कोणते आहेत, कोणत्या शेअर्स मध्ये किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे, त्या फंड चा turnover ratio काय आहे, म्हणजे किती वेळा शेअर्स विक्री-खरेदी केली, जास्त वेळा खरेदी-विक्री करत असेल तर थोडे सावध व्हा.
  • फंड ने कोणकोणत्या इंडस्ट्री मध्ये गुंतवणूक केली आहे, किती प्रमाणात केली आहे, पोर्टफोलियो मध्ये विविधिकरण (diversification) आहे का ते चेक करा, म्हणजे एका इंडस्ट्री मध्ये जास्त गुंतवणूक केली असेल आणि जर त्या इंडस्ट्री मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर रिटर्न्स वर परिणाम होऊ शकतो.

स्टेप ७ – म्यूचुअल फंड मध्ये चार्जेस किती कट होतात ते चेक करा :

  • म्यूचुअल फंड मध्ये दोन प्रकारे चार्जेस कट होतात, (१) expense ratio (२) Exit Load.
  • Expense ratio म्हणजे, तुमचे पैसे फंड मध्ये गुंतवण्यासाठी म्यूचुअल फंडचा काही खर्च होतो ते expense ratio द्वारे घेतला जातो, त्यामुळे expense ratio चेक करा, कमी expense ratio असेल तर चांगले, पण जर फंड चे रिटर्न्स खूप चांगले असतील तर expense ratio जरा जास्त असेल तरी चालते.
  • Exit Load म्हणजे जर तुम्ही १ वर्षाच्या आत पैसे काढत असाल तर हे चार्जेस कट केले जातात, जे प्रत्येक म्यूचुअल फंड चे वेगळे असतात, ते चेक करा.

स्टेप ८ – म्यूचुअल फंड ची निवड झाल्यावर गुंतवणूक सुरू करा :

  • वरील सर्व स्टेप मध्ये जो म्यूचुअल फंड अंतिम होईल त्या फंड मध्ये SIP द्वारे गुंतवणूक करायला सुरुवात करा, आणि आर्थिक ध्येयाप्रमाणे दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा.
  • पण, ह्या म्यूचुअल फंड ची वेळोवेळी तपासणी करत रहा, वर्षामधून एकदा किंव्हा दोनदा केली तरी चालेल, सलग चांगले रिटर्न्स मिळताहेत की नाही, टॉप १० रिटर्न्स देणाऱ्या कॅटेगरी मध्ये येत आहे की नाही, वैगेरे.
  • पण एका वर्षामध्ये जर कमी रिटर्न्स आलेत तर लगेचच म्यूचुअल फंड बदलू नका, अजून सहा महीने बघा किंव्हा जास्तीत जास्त २ वर्षे तो फंड कमी रिटर्न्स देत असेल तर नक्कीच तो फंड बदला.

डायरेक्ट किंव्हा रेग्युलर म्यूचुअल फंड, कोणता म्यूचुअल फंड निवडावा | Direct vs Regular mutual fund, which is better in marathi :

डायरेक्ट म्यूचुअल फंड म्हणजे आपण थेट म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करतो, म्हणजे म्यूचुअल फंडच्या वेबसाइट वरून किंव्हा डिस्काऊंट ब्रोकर अप्प वरून ऑनलाइन गुंतवणूक करतो आणि रेग्युलर म्यूचुअल म्यूचुअल फंड मध्ये सल्लागार, ब्रोकर किंव्हा डिस्ट्रिब्युटर मध्यस्ती असतो, मध्यस्तीचे चार्जेसही रेग्युलर म्यूचुअल फंड मध्ये जोडले जातात, म्हणजे डायरेक्ट म्यूचुअल फंड मध्ये रेग्युलर म्यूचुअल फंड पेक्षा कमी चार्जेस लागतात, त्यामुळे डायरेक्ट म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे उत्तम.

म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे का | Is it safe to invest in mutual fund in marathi :

हो, म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे, कारण म्यूचुअल फंड आणि शेअर मार्केट हे सेबी च्या अंतर्गत येते आणि सेबी हा खूप चांगला नियंत्रक आहे, सेबी च्या नियमावली खूप कडक आहेत, काही अडचण आल्यास तुम्ही सेबी कडे तक्रार करू शकता, त्यामुळे म्यूचुअल फंड किंव्हा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. ह्यावर आमचा “सेबी कडे तक्रार कशी करायची” हा आर्टिकल वाचू शकता.

निष्कर्ष :

आम्ही आशा करतो की सर्वोत्तम म्यूचुअल फंड कसा निवडायचा हे तुम्हाला कळले असेल, पण ही पद्धत फक्त इक्विटि म्यूचुअल फंड साठीच लागू होते, कारण इतर म्यूचुअल फंड म्हणजे डेब्ट म्यूचुअल किंव्हा इंडेक्स म्यूचुअल फंड निवडायची पद्धत वेगळी आहे, त्यासाठी आमचा “इंडेक्स फंड कसा निवडायचा” हा आर्टिकल वाचू शकता, आणि ह्या आर्टिकल बद्दल काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा, आम्ही नक्कीच त्याचे उत्तर देऊ, धन्यवाद.

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

FAQs

  1. Q: किती म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करावी ?

    Ans: ४ ते ५ म्यूचुअल फंड मध्येच गुंतवणूक करावी, कारण त्यापेक्षा जास्त म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक केली तर जास्त रिटर्न्स मिळणार नाहीत. एका कॅटेगरी मधील एकाच फंड मध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे.

  2. Q: म्यूचुअल फंड मधून पैसे कसे कामवायचे ?

    Ans: म्यूचुअल फंड मधून दीर्घ काळ गुंतवणूक करून चांगले पैसे कामवू शकतो, अगदी महिन्याचा १० रूपयाच्या SIP ने सुद्धा ६० वर्षामध्ये १ करोंड कमवू शकतो.

हे पण वाचा :

ह्या Web Stories पण बघा, तुम्हाला नक्कीच आवढतील :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चंद्रयान-३ चा आपल्याला काय फायदा होईल ? आता कुटुंबाचे बेवारस पैसे मिळवा, RBI ने सुरू केले UDGAM What happen if Income tax return is not filed ? PE Ratio म्हणजे काय ?
चंद्रयान-३ चा आपल्याला काय फायदा होईल ? आता कुटुंबाचे बेवारस पैसे मिळवा, RBI ने सुरू केले UDGAM What happen if Income tax return is not filed ? PE Ratio म्हणजे काय ?
रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर