सर्वोत्तम आरोग्य विमा कसा निवडावा | 10 tips to choose best health insurance plan in marathi

health insurance buying guide in marathi, How do I know which health insurance is better in marathi, How much health insurance should I choose in marathi, best health insurance policy in marathi, How to pick best health insurance in marathi, guide to choosing health insurance plan in marathi, a step by step guide to choose right health insurance plan in marathi, how to select best health insurance plan in India

Table of Contents

सुरुवात :

आज २०२३ मध्ये एका सर्जरी ची किंमत ५ लाख आहे, ती पुढच्या वर्षी ५,७०,००० होईल, कारण मेडिकलची महागाई दरवर्षी १४% ने वाढते. दुर्दैवाने कधी हॉस्पिटल ला जावे लागले तर आपली बचत काही क्षणात संपून जाते, त्यामुळे हेल्थ इन्शुरेंस घेणे खूप महत्वाचे आहे, पण काहीवेळेला हेल्थ इन्शुरेंस असला तरी तो इन्शुरेंस कंपनीद्वारे रीजेक्ट केला जातो, कारण इन्शुरेंस घेताना आपण कागतपत्रे कधीच चेक करत नाही, आणि कोणत्या गोष्टी चेक कराव्या त्या माहीत पण नसतात.

हेल्थ इन्शुरेंस का घेतला पाहिजे | Why do we need health insurance in marathi :

भारतामध्ये ८०% लोक हॉस्पिटल बिलामुळे गरीब होतात, जमवलेली बचत एका झटक्यात संपते, एक साधा विचार करा, दुर्दैवाने कधी हॉस्पिटल ला जावे लागले तर तुमच्याकडे हॉस्पिटल बिल भरायला ५ ते १० लाख आहेत का, आणि असलेच तर ते तुम्ही हॉस्पिटल बिल वर एका झटक्यात संपवणार का, विचार करा हे पैसे कमवायला किती वेळ आणि मेहनत लागते, त्यामुळेच हेल्थ इन्शुरेंस घेणे महत्वाचे आहे.

माझ्याकडे कॉर्पोरेट विमा असल्यास मी आरोग्य विमा घ्यावा का ? :

हो, तरीही घ्यावा, कारण कॉर्पोरेट विमा हा तुमची नोकरी असेपर्यंत असतो, जेव्हा नोकरी जाते तेव्हा इन्शुरेंस पण जातो, समझा तुम्ही ६० नंतर रिटायर झालात, तेव्हाच तर खरी इन्शुरेंस ची गरज असते, आणि तुम्ही जर तेव्हा नवीन इन्शुरेंस घ्यायला गेलात तर तुम्हाला तो मिळणार नाही, म्हणून जेव्हा वेळ असते, आणि जेव्हा तुम्हाला काही आजार नसतो तेव्हा तुम्ही इन्शुरेंस घेतला पाहिजे, कारण तेव्हा सहज आणि कमी प्रीमियम मध्ये इन्शुरेंस मिळतो.

हेल्थ इन्शुरेंस कवर कितीचा घेतला पाहिजे | How much health insurance cover do I need in marathi :

तुम्ही जेथे राहता त्या परिसरामधील हॉस्पिटल मध्ये एका सर्जरी चा खर्च किती असतो ते चेक करा, खेडेगावामद्धे किंव्हा शहरापासून लाम हा खर्च थोडा कमी असतो आणि शहरांमध्ये जास्त असतो, आणि दुसरे म्हणजे ही तुमच्या आरोग्यावर पण अवलंबून आहे, म्हणजे तुम्ही आजारी की निरोगी आहात, तुम्हाला किती वेळा हॉस्पिटल मध्ये जावे लागते, ह्या सगळ्याचा अंदाज घ्या आणि मगच कितीचा कवर घ्यायचे आहे ते ठरवा, साधारणतः आरोग्य विमा ५ लाख ते १० लाख पर्यन्त असावा.

हेल्थ इन्शुरेंस घेताना ह्या गोष्टी नक्की चेक करा | How to choose best health insurance in marathi :

हेल्थ इन्शुरेंस घेताना माही महत्वाच्या गोष्टी चेक कराव्या लागतात, जेणेकरून गरजेच्या वेळी तुमचा इन्शुरेंस रीजेक्ट होणार नाहीत, कोणत्या गोष्टी चेक करायच्या त्या स्टेप बाय स्टेप बघूया:

१. रूम रेंट कॅप (No Room Rent Cap) :

  • रूम रेंट कॅप म्हणजे इन्शुरेंस क्लेम करताना हॉस्पिटल मधील सर्व बिले ही तुमच्या रूम रेंट शी जोडलेली असतात.
  • उदाहरण – समझा इन्शुरेंस मध्ये रूम रेंट लिमिट २००० पर्यंतच असेल, आणि तुम्ही २५०० रूम रेंट मध्ये अडमिट झालात, तर हॉस्पिटलची सर्व बिले २००० च्या हिशोबणे कॅलक्युलेट होणार, म्हणजे २००० हे २५०० च्या ८०% आहे, त्यामुळे ८०% क्लेम मिळेल, बाकीचे २०% तुम्हाला भरावे लागेल.
  • हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे रूम रेंट कॅप नसणारा हेल्थ इन्शुरेंस घ्या.

२. कॅशलेस ट्रीटमेंट (Cashless Treatment) :

  • कॅशलेस ट्रीटमेंट मध्ये तुमच्या कडून बिल घेतले जात नाही आणि ते थेट इन्शुरेंस कंपनी कडून घेतले जाते, म्हणजे इथे क्लेम करायची काहीच गरज नसते.
  • कॅशलेस ट्रीटमेंटसाठी प्रतेक इन्शुरेंस कंपनी हॉस्पिटलशी संलग्न असतात, त्या हॉस्पिटल मध्येच तुमची कॅशलेस ट्रीटमेंट होणार, त्यामुळे इन्शुरेंस घेताना कॅशलेस हॉस्पिटलची यादी चेक करा, जेणेकरून तुमची ट्रीटमेंट कॅशलेस होण्यास मदत होईल.

३. क्लेम सेट्टलमेंट रेशियो (Claim Settlement Ratio) :

  • क्लेम सेट्टलमेंट रेशियो म्हणजे इन्शुरेंस कंपनी कडे आलेल्या क्लेम पैकी किती क्लेम मंजूर होतात, हे टक्केवारी मध्ये IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) द्वारे मोजले जाते, म्हणजे शंभरापैकी ९० क्लेम मंजूर केलेत की क्लेम सेट्टलमेंट रेशियो ९०% झाला.
  • जेवढा जास्त क्लेम सेट्टलमेंट रेशियो तेवढे चांगले, साधरणतः ९३% ते ९६% मध्ये असणे चांगले, याचा अर्थ कंपनी विनाकारण क्लेम रीजेक्ट करत नाही, म्हणजे आपला क्लेम मंजूर होण्याची शक्यता जास्त आहे.

४. इनकर्ड क्लेम रेशियो (Incurred Claim Ratio) :

  • इन्शुरेंस क्लेम रेशियो म्हणजे कंपनीकडे आलेल्या प्रीमियम पैकी किती पैसे कंपनी क्लेम चे पेमेंट करते, म्हणजे कंपनी कडे काही पैसे उरतात की नाही याचा अंदाज येतो.
  • उदाहरण – समझा कंपनीकडे सगळ्यांचे मिळून १०० रुपयाचे प्रीमियम येते, आणि ९० रुपये क्लेम सेट्टल करण्यामध्ये जातात आणि १० रुपये कंपनीचा फायदा होतो.
  • सगळेच पैसे क्लेम मध्ये संपवणे पण कंपनीसाठी योग्य नाही, त्यामुळे हा रेशियो ९०% तो ९३% असणे योग्य आहे.

५. रेस्टॉरेशनचा फायदा (Restoration Benefit) :

  • Restoration benefit म्हणजे, घेतलेला इन्शुरेंस आपण पूर्ण वापरला तर तेवढाच इन्शुरेंस त्या वर्षासाठी पुन्हा लागू होतो, म्हणजे पूर्ण इन्शुरेंस कवर रेस्टोर होतो.
  • उदाहरण – तुमच्या इन्शुरेंस मध्ये Restoration benefit असेल तर, समझा तुम्ही ५ लाखाचा इन्शुरेंस घेतला आणि तो वर्षाआधीच संपला, तर पुन्हा आणखी ५ लाखाचा इन्शुरेंस मिळतो.
  • आरोग्य विमा घेताना हा फायदा आहे का ते नक्की चेक करा.

६. हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याआधीचा आणि नंतरचा खर्च (Pre and post hospitalization charges) :

  • Pre and post hospitalization म्हणजे हॉस्पिटल मध्ये अडमिट होण्याच्या आधीचा आणि नंतरचा खर्च इन्शुरेंस मध्ये कवर होतो का नाही.
  • कारण बहुतेकदा हॉस्पिटल मध्ये अडमिट होण्याआधी आपला खूपसा खर्च होत असतो, म्हणजे रक्त चेक, X-ray, चेक-अप वैगेरे, हे खर्च पण इन्शुरेंस मध्ये कवर होतात, तेव्हा हे पण चेक करा.

७. डे केअर ट्रीटमेंट (Day care treatment) :

  • Day care treatment म्हणजे आजकाल टेक्नॉलजी खूप सुधारल्यामुळे काही ऑपरेशन २ ते ३ तासातच होतात आणि त्यामध्ये अडमिट व्हायची गरज नसते.
  • अशामद्धे आपण अडमिट झालोच नाही म्हणून इन्शुरेंस कंपनी क्लेम मंजूर करत नाही, पण इन्शुरेंस मध्ये Day care treatment असेल तर तो क्लेम मिळतो, त्यामुळे हे ही चेक करा.

८. नो को-पे (No Co-pay) :

  • इन्शुरेंस मध्ये Co-pay असेल तर क्लेम ची काही रक्कम आपल्याला भरावी लागते, म्हणजे ८०% इन्शुरेंस कंपनी आणि २०% आपण बिल भरणे.
  • त्यामुळे Co-pay नसलेला इन्शुरेंस घ्या, जेणेकरून हॉस्पिटलचे संपूर्ण बिल इन्शुरेंस कंपनीद्वारे भरले जाईल.

९. नो क्लेम बोनस (No Claim bonus) :

  • नो क्लेम बोनस म्हणजे जर आपण एका वर्षात इन्शुरेंस क्लेम केला नाही तर आपल्याला त्याबदल्यात काही बोनस मिळतो, हा बोनस म्हणून इन्शुरेंस कवर वाढवून दिला जातो.
  • उदाहरण – जर तुम्ही ५ लाखाचा इन्शुरेंस घेतला आणि तो क्लेम केला नाही, तर बोनस महून तुमचा कवर आणखी ५ लाखाने वाढविला जातो, पण तो दरवर्षी वाढत नाही, ह्याची काही मर्यादा आहेत, साधारणतः हे कवर फक्त डब्बल होते, म्हणजे ५ चे १० लाख होतात.
  • म्हणून नो क्लेम बोनस आहे का ते पण चेक करा, जेणेकरून तुमचा इन्शुरेंस कवर वाढेल, त्यामध्ये आपलाच फायदा आहे.

१०. आधीच असलेल्या आजरांचा प्रतीक्षा कालावधी (Waiting period for existing illness) :

  • तुम्हाला इन्शुरेंस घेण्याआधीच काही आजार असेल तर त्याचे क्लेम तुम्ही लगेचच नाही घेऊ शकत, त्यासाठी थोडे थांबावे लागतो, त्याला waiting period for existing illness म्हणतात.
  • प्रतेक इन्शुरेंसचा ह्यासाठी कालावधी वेगवेगळा असतो, जेवढा कमी असेल तेवढे चांगले, साधारणतः हा कालावधी २ ते ३ वर्षाचा असतो.

ह्या सर्व पॉईंट्स बद्दलची माहिती तुम्ही पॉलिसी बाजार च्या वेबसाइट वर जाऊन सहज चेक करू शकता, policybazaar.com वर विजिट करा, हेल्थ इन्शुरेंस वर क्लिक करून काही बेसिक माहिती दिल्यानंतर तुम्ही वरील सर्व पॉइंट फिल्टर करून एक चांगला हेल्थ इन्शुरेंस घेऊ शकता.

आणखी काही टिप्स :

आणखी काही छोट्या टिप्स आहेत ते ही तुम्ही हेल्थ इन्शुरेंस घेताना चेक करू शकता.

  • ओपीडी कवर (OPD Cover): हा जास्त मोठा खर्च नाही आहे, पण काही इन्शुरेंस मध्ये हे पण कवर असते, तेव्हा तुम्हाला OPD कवर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता.
  • घरी हॉस्पिटलायझेशन (Hospitalization at home): म्हणजे काही आजारांमध्ये रुग्ण हॉस्पिटल मध्ये जाऊ शकत नाही, तेव्हा त्याची ट्रीटमेंट घरीच केली जाते, तेव्हा अशाप्रकारचा क्लेम इन्शुरेंस कडून मिळेल का हे hospitalization at home असेल तर मिळते.
  • प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी (Preventive Health Check-up): म्हणजे वर्षातून एकदा नॉर्मल हेल्थ चेक अप करणे चांगले असते, त्यामुळे आपण निरोगी आहात का ते कळते, हे ही काही इन्शुरेंस पॉलिसी मध्ये कवर असते, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते मिळवू शकता.
  • Eye/Dental Care: काही पॉलिसी मध्ये Eye/Dental care कवर नसतो, जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते पॉलिसी मध्ये जोडू शकता.
  • Maternity Benefit: जर तुम्ही काही फॅमिली प्लॅनिंग केली असेल तर maternity बेनिफिट सुद्धा हेल्थ इन्शुरेंस मध्ये जोडू शकता.

निष्कर्ष :

हेल्थ इन्शुरेंस घेणे आज खूप गरजेच आहे, आणि त्याहून महत्वाचे आहे की कोणता इन्शुरेंस आपल्यासाठी योग्य आहे, बहुतेकदा हेल्थ इन्शुरेंस घेताना कोणत्या गोष्टी चेक कराव्या हे माहीत नसल्यामुळे खूप लोकांचे क्लेम रीजेक्ट झालेत, पण ते तुमच्या बरोबर होऊ नये असे आम्हाला वाटते, म्हणून हेल्थ इन्शुरेंस घेताना वरील पॉइंट जरूर चेक करा, आणि काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये कळवा, धन्यवाद.

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

FAQs

  1. Q: Which company have best health insurance in India in marathi ?

    Ans: साधारणतः ज्या कंपनीचे नाव मार्केट मध्ये चांगले आहे किंवा रेकॉर्ड चांगले आहे, त्या कंपनी मधून हेल्थ इन्शुरेंस घेणे चांगले.

हे पण वाचा :

ह्या Web Stories पण बघा, तुम्हाला नक्कीच आवढतील :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Benefits of investing in Mutual Funds 2023 PE Ratio म्हणजे काय ? डिजिटल रूपी म्हणजे काय ? SIP म्हणजे काय?
Benefits of investing in Mutual Funds 2023 PE Ratio म्हणजे काय ? डिजिटल रूपी म्हणजे काय ? SIP म्हणजे काय?
रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर