गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय कोणता ? | Which is the best investment plan in India for middle class in marathi

Best investment plan in 2023 in marathi, Where to invest in 2023 in marathi, best investment option in India in marathi, where to invest my money for best return in marathi, best investment option for young adult in India in marathi, best investment option for salaried person in marathi, which option is best for investment in marathi

सुरुवात :

गुंतवणूक कोठे करावी हा एक मोठा प्रश आहे, गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, काही सुरक्षित आहेत पण कमी रिटर्न्स देतात, तर काही पर्याय थोडे रिस्की आहेत पण त्यामधून जास्त रिटर्न्स मिळतात, अशामुळे जास्त गोंधळ उडतो, कोठे गुंतवणूक करावी हे कळत नाही, ह्या आर्टिकल मध्ये आपण कोणत्या गुंतवणुकीमद्धे जास्त रिटर्न्स मिळतात आणि कोणती गुंतवणूक आपल्यासाठी योग्य आहे ते बघणार आहोत.

१. बचत खाते :

बचत खाते हा सर्वात पहिला आणि सोपा पर्याय सगळ्यांना माहीत आहे, पण बचत खात्यामध्ये तुमचे पैसे कधी वाढत नाहीत तर कमी होतात, कारण महागाई दरवर्षी ६% ते ७% ने वाढते आणि बचत खात्यामध्ये ३% ते ४% व्याज मिळते, त्यामुळे महागाईच्या हिशोबणे बघितल तर बचत खात्यामध्ये पैसे कमी होतात, पण बचत खात्यामध्ये पैसे ठेवायचे नाही असे नाही आहे, बचत खात्यामध्ये २ ते ३ महिन्याला लागतील एवढेच पैसे ठेवावे, जेणेकरून बाकीचे पैसे जास्त रिटर्न्स देणाऱ्या पर्यायामद्धे ठेऊन त्या पैशावर चांगले रिटर्न्स मिळतील.

  • बचत खात्याचे फायदे:
  • चटकन पैसे काढता येतात, पैसे बँकेत सुरक्षित राहतात.
  • बचत खाते ओपेन करणे आणि हाताळणे खूप सोपे आहे.
  • बचत खात्याचे नुकसान:
  • सर्वात कमी व्याज मिळते.
  • पैसे महागाई पेक्षा जास्त वाढत नाहीत.

२. फिक्स डिपॉजिट (FD) :

FD सर्वात सुरक्षित आणि पूर्वीपासून चालत आलेला पर्याय आहे, सामान्यतः गुंतवणुकीसाठी FD हा सर्वात पहिला पर्याय मनात येतो आणि ह्यामध्ये बचत खत्यापेक्षा जास्त म्हणजेच ७% ते ८% रिटर्न्स मिळतात, पण हे रिटर्न्स पण महागाई पेक्षा कमी आहेत, कारण FD वर टॅक्स दिल्याननंतरचे रिटर्न्स हे महागाईच्या जवळपासच असतात, FD मध्ये पैसे फक्त सुरक्षित राहतात, पण ते वाढत नाहीत, त्यामुळे FD हा जास्त रिटर्न्स मिळवून देणारा गुंतवणूक पर्याय नाही आहे.

  • FD चे फायदे:
  • पैसे सुरक्षित राहतात.
  • फिक्स रिटर्न मिळतात.
  • FD चे तोटे:
  • इतर गुंतवणुकीपेक्षा व्याज कमी मिळते.
  • व्याजावर टॅक्स द्यावा लागतो.

३. पी. यफ. (PF) :

PF हा सुद्धा एक सुरक्षित पर्याय मानला जातो, हा पर्याय साधारणतः रिटायरमेंटसाठी आहे असे मानले जाते, PF मध्ये साधारणतः ८% रिटर्न्स मिळतात, त्यामध्ये सरकारची गॅरंटी असेते, आणि ते टॅक्स फ्री पण असतात, त्यामुळे हा एक चांगला पर्याय आहे, पण इथे तुमचे पैसे दीर्घ काळासाठी लॉक होतात, मध्येच कधी पैशांची गरज असेल तर ते सहज काढता येत नाहीत, त्यामुळे सर्व पैसे PF मध्ये गुंतवू नये, १०% ते २०% गुंतवणूक करणे योग्य असेल.

  • PF चे फायदे:
  • ८० सी च्या अंतर्गत टॅक्स चा फायदा मिळतो.
  • फिक्स रिटर्न्स मिळतात आणि ते पण FD पेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात.
  • PF चे तोटे:
  • पैसे जास्त काळासाठी अडकले जातात (Lock-in period)
  • पैसे सहज काढता येत नाहीत.

४. सोने (Gold) :

सोन्यामद्धे गुंतवणूक करणे हा एक भावनात्मक पर्याय आहे, आणि ही गुंतवणूक पिढ्यानपिढ्या चालत राहते, सोन्यामधील गुंतणूकीमद्धे भावना जोडलेल्या असल्यामुळे ही गुंतवणूक कधी विकली जात नाही, त्यामुळे कधी तुम्हाला पैसे हवे असतील त्यावेळेला साधारणतः कोणीच सोने विकत नाही. सोन्यामद्धे दीर्घकाळात ९% ते १०% रिटर्न्स मिळतात पण हे शेअर मार्केट मधील रिटर्न्स पेक्षा कमी आहेत.

पण असे नाही आहे की सोन्यामद्धे गुंतवणूक करू नये, संपूर्ण गुंतवणुकीच्या १०% ते २०% सोन्यामद्धे गुंतवणे योग्य असेल, पण सोन्यामद्धे दगिनींच्या स्वरूपात गुंतवणूक करण्यापेक्षा सॉवेरीन गोल्ड बॉन्ड मध्ये गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे असते, कारण ह्यामधे दरवर्षी २.५% व्याज मिळते, जे इतर कोणत्याही सोन्याच्या गुंतवणुकीमद्धे मिळत नाही.

  • सोन्यामधील गुंतवणुकीचे फायदे:
  • सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आणि पिढ्यानपिढ्या गुंतवणूक चालत राहते.
  • महागाई पेक्षा थोडे जास्त रिटर्न्स मिळतात.
  • सोन्यामधील गुंतवणुकीचे तोटे:
  • सोने सांभाळणे महाग असते आणि चोरी होण्याची भीती असते.
  • कमी काळामध्ये सोन्याची किंमत खूप वर खाली होत असते.

५. शेअर मार्केट :

शेअर मार्केट मध्ये सर्वात जास्त रिटर्न्स मिळतात हे खरे आहे पण थेट शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या कडे तज्ञ ज्ञान असणे आवश्यक आहे, कंपनीचे रिसर्च करावे लागते, कंपनीचा बिझनेस काय आहे, प्रॉफिट, वैगेरे, सर्व अनॅलिसिस करावे लागते, जे आपल्या सारख्या सामान्य माणसाला नोकरी करून शक्य होत नाही. शेअर मार्केट मध्ये दोन प्रकारे गुंतवणूक करता येते, ट्रेडिंग करणे किंव्हा शेअर्स विकत घेऊन दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे.

सेबी नुसार ट्रेडिंग मध्ये १% गुंतवणूकदार पैसे कमवतात आणि ९९% गमावतात, जर तुम्ही त्या १% मध्ये मोडत असाल तर उत्तम अथवा थोड विचार करावा लागेल, आणि दीर्घकाळासाठी शेअर्स विकत घेण्यासाठी जे ज्ञान आणि अभ्यास करावा लागतो, तो तुम्ही करत असाल तर उत्तम, तरच तुम्ही शेअर मार्केट माधुन जास्त रिटर्न्स मिळवु शकता.

६. म्यूचुअल फंड :

म्यूचुअल फंड म्हणजे एक प्रकारचा फंड असतो जो गुंतवणूकदारांचे पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवतो, त्यामध्ये फंड मॅनेजर तुमचे पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवून तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळवून देत असतो, त्यामुळे आपल्याला शेअर मार्केटची माहिती नसेल तरीही चालते, म्यूचुअल फंड हा दीर्घकाळात सर्वात जास्त रिटर्न्स मिळवून देणारा सर्वात सोपा पर्याय आहे.

म्यूचुअल फंड चे अनेक पर्याय आहेत, वेगवेगळे म्यूचुअल फंड मधून वेगवेगळे रिटर्न्स मिळतात, तुम्ही तुमची आर्थिक ध्येय काय आहेत हे जाणून घेऊन गुंतवणूक केलीत तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो, ह्यावरील आमचा “आर्थिक ध्येयाप्रमणे गुंतवणूक कशी करायची” हा आर्टिकल वाचू शकता, त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

म्यूचुअल फंड मध्ये दीर्घकाळात सर्वात जास्त रिटर्न्स कशे मिळू शकतात त्यासाठी आमचे “१० रूपयाच्या SIP ने ६० वर्षामध्ये १ कमवू शकता“, “फक्त दिवसाचे चहा चे पैसे वाचवून सुद्धा दीर्घकाळात १ करोड कमवू शकता.” हे आर्टिकल वाचू शकता.

  • म्यूचुअल फंड चे फायदे:
  • कमी पैशाने पण सुरुवात करता येते.
  • शेअर मार्केट ची माहिती नसेल तरी चालते, फंड मॅनेजर तुमचे काम करत असतो.
  • टॅक्स मध्ये सूट मिळते.
  • अधिक फायदे सविस्तर मध्ये जाणून घेण्यासाठी “म्यूचुअल फंड चे फायदे” हा आर्टिकल वाचू शकता.
  • म्यूचुअल फंड चे तोटे:
  • शेअर मार्केट शी लिंक असल्यामुळे थोडे रिस्क आहे.
  • फिक्स रिटर्न्स ची हमी नाही.
  • काही म्यूचुअल फंड मध्ये जास्त फी आकारली जाते, पण चांगला म्यूचुअल फंड निवडला तर तुम्हाला फायदा होतो.
  • त्यासाठी “चांगला म्यूचुअल फंड कसा निवडावा” हा आर्टिकल वाचू शकता.

निष्कर्ष :

आम्ही आशा करतो की कोणता गुंतवणूक पर्याय चांगला आहे ते तुम्हाला आता समजले असेल, ह्या मध्ये आम्ही कोणत्याही एका प्रकारच्या गुंतवणुकीची प्रशंसा करत नाही आहे, प्रतेक गुंतवणूक पर्याय वेगवेगळ्या उद्देशांसाठी असतो, तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्या पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे त्या पर्यायामद्धे गुंतवणूक करू शकता, आणि ह्या बद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये कळवू शकता, धन्यवाद.

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

FAQs

  1. Q: How to invest money in marathi ?

    Ans: गुंतवणूक नेहमी आर्थिक ध्येयाप्रमाणे करावी, त्यामुळे तुम्हाला किती पैसे हवे आहेत ते कळते, पैसे किती काळ गुटणवणूक ठेवावे हे कळते.

  2. Q: कोणत्या गुंतवणुकीमद्धे दीर्घकाळात सर्वात जास्त परतावा मिळतो ?

    Ans: शेअर मार्केट वरील गुंतवणुकीमद्धे दीर्घकाळात सर्वात जास्त परतावा मिळतो.

हे पण वाचा :

ह्या Web Stories पण बघा, तुम्हाला नक्कीच आवढतील :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

SIP म्हणजे काय? चंद्रयान-३ चा आपल्याला काय फायदा होईल ? आता कुटुंबाचे बेवारस पैसे मिळवा, RBI ने सुरू केले UDGAM How to become successful investor in Marathi
SIP म्हणजे काय? चंद्रयान-३ चा आपल्याला काय फायदा होईल ? आता कुटुंबाचे बेवारस पैसे मिळवा, RBI ने सुरू केले UDGAM How to become successful investor in Marathi
रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर