SIP चे काळे सत्य | Dark truth of SIP in marathi

सुरुवात :

AMFI नुसार आज भारतामध्ये ७.६ करोड लोक १७,६०० करोड रुपयांची SIP करतात, पण SIP खरंच चांगली आहे काय, खरंच ह्यामध्ये काहीच रिस्क नाही आहे ?, कोणतीच नेगेटिव बाजू नाही आहे ? (Dark side of SIP)

Dark truth of SIP ह्या आर्टिकल मध्ये आपण SIP करताना काही चुका होतात त्या बघणार आहोत, जेणेकरून तुम्ही त्या चुका करणार नाहीत, तुम्ही योग्य SIP ची निवड करू शकाल आणि SIP मधून चांगले रिटर्न्स मिळवू शकाल.

दीर्घ काळासाठी गुंतवणूक महत्वाची (First Dark truth of SIP is need to invest for Long term) :

SIP ची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यामधून दीर्घकाळामध्ये चांगले रिटर्न्स मिळतात, म्हणून जर तुम्हाला कमी वेळेत पैसे कमवायचे असतील तर SIP गुंतवणूक करू नका.

जर SIP मधील लॉस बघून तुम्हाला घाम फुटक असेल आणि तुमचे मन अस्वस्थ होत असेल, तर नक्कीच तुम्ही SIP गुंतवणूक करू नये, FD करा ते बेस्ट आहे, म्हणून आधी मनाची तयारी करा आणि मग गुंतवणूक करा.

पण दीर्घकाळात SIP मध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळतात, ह्यावर आम्ही सविस्तर मध्ये आर्टिकल लिहिले आहेत, ते तुम्ही वाचू शकता, लिंक खाली देत आहे.

६०० रूपयाच्या यस.आय.पी. ने १ करोड कसे कमवू शकतो.
फक्त १० रूपयाच्या यस.आय.पी. ने सुद्धा १ करोड कमवू शकतो.
१ कप चहा च्या पैशाची यस.आय.पी. करून सुद्धा १ करोड कमवू शकतो.

शॉर्ट टर्म मध्ये नेगेटिव रिटर्न्स मिळू शकतात (SIP is not for short term requirements) :

SIP ही शेअर मार्केट शी लिंक असते, म्हणून शॉर्ट टर्म मध्ये मार्केट पडले की SIP मधून पण नेगेटिव रिटर्न्स मिळतात, कमी वेळेत पैसे हवे असतील तर तुम्ही FD मध्ये किंव्हा डेब्ट म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करावी.

इक्विटि आणि डेब्ट फंड मधील फरक (Equity vs Debt Mutual fund) :

बहुतेकदा लोकं कोणीतरी सांगतो म्हणून म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करतात, पण इक्विटि आणि डेब्ट कोणत्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करावी हे माहीत नसते, त्यामुळे ही चूक करतात आणि रिटर्न्स कमी मिळतात.

इक्विटि म्यूचुअल फंड हे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात आणि डेब्ट म्यूचुअल फंड हे फिक्स रिटर्न्स देणाऱ्या फंड मध्ये गुंतवणूक करतात, डेब्ट मध्ये शॉर्ट टर्म आणि इक्विटि मध्ये लॉन्ग टर्म साठी गुंतवणूक करावी.

एक्जिट लोड (Exit load in SIP) :

एक्जिट लोड ही एक दूसरी महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही चेक केली पाहिजे, कोणत्याही म्यूचुअल फंड मधून १ वर्षाआधी जर पैसे काढले तर २% पर्यन्त एक्जिट लोड कट होतो.

आपल्याला वाटते की SIP ला एक वर्ष झाली की पैसे काढू, एक्जिट लोड द्यावा लागणार नाही, पण तसे नसते, जर तुम्ही १ जानेवरी २०२३ ला SIP चालू करून ती जानेवरी २०२४ मध्ये काढली तरी एक्जिट लोड द्यावा लागतो.

असे का ?, कारण जानेवरी २०२३ महिन्यातील SIP ला जानेवरी २०२४ मध्ये १ वर्ष पूर्ण होतात, पण फेब्रुवारी पासून पुढील SIP ला होत नाही, डिसेंबर मधील SIP ला जानेवरी मध्ये १ महिना होतो.

ही एक अशी गोष्ट आहे जी दिसत नाही, त्यामुळे चूक होतेच, त्यामुळे एक्जिट लोड वर लक्ष दया आणि त्याप्रमाणे SIP मधून पैसे काढा.

रेग्युलर आणि डायरेक्ट प्लान मधील एक्सपेंस रेशियो चा फरक (Expense Ratio in Regular vs Direct plan) :

रेग्युलर म्यूचुअल फंड मधील एक्सपेंस रेशियो हा डायरेक्ट म्यूचुअल फंड मधील एक्सपेंस रेशियो पेक्षा जास्त असतो, कारण रेग्युलर मध्ये मध्सती असतो आणि डायरेक्ट मध्ये थेट म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक केली जाते.

त्यामुळे डायरेक्ट म्यूचुअल फंड मध्ये फीज कमी होते आणि तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळतात, हे जर माहीत नसेल तर ही एक चूक होऊ शकते.

ग्रोथ प्लान आणि डिविडेन्ट प्लान मधील फरक (Growth plan vs Dividend or Bonus plan of SIP) :

ग्रोथ प्लान मध्ये डिविडेन्ट प्लान पेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात, कारण डिविडेन्ट म्यूचुअल फंड मध्ये तुमच्या अकाऊंट मध्ये डिविडेन्ट जमा होतो, आणि ग्रोथ प्लान मध्ये डिविडेन्ट परत म्यूचुअल फंड मध्ये गुंतवले जातात.

म्यूचुअल फंड ज्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात, त्यामध्ये वेळोवेळी डिविडेन्ट मिळते, डिविडेन्ट म्यूचुअल फंड प्लान मध्ये ते गुंतवणूकदाराला दिले जाते आणि ग्रोथ प्लान मध्ये ते परत गुंतवले जाते.

ग्रोथ म्यूचुअल फंड च्या प्लान मध्ये डिविडेन्ट परत गुंतवल्यामुळे जास्त पैसे गुंतवले जातात आणि त्यामुळे ग्रोथ प्लान मध्ये दीर्घकाळात डिविडेन्ट म्यूचुअल फंड प्लान पेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात.

शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (Short term capital gain tax) :

जर तुम्ही म्यूचुअल फंड मधून एका वर्षाआधीच पैसे काढले तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतात आणि त्यावर १५% टॅक्स लागतो, त्यामुळे म्यूचुअल फंड मधून लगेचच पैसे काढू नका, रिटर्न कमी मिळतील.

SIP चे तोटे | Disadvantages of SIP in marathi :

  • मार्केट रिस्क – SIP शेअर मार्केटशी लिंक असल्यामुळे यामध्ये मार्केट चे रिस्क आहे आणि शेअर मार्केट हे शॉर्ट टर्म मध्ये खूप वर खाली होत असते.
  • फंड मॅनेजर वरील अवलंबण – म्यूचुअल फंड हे पूर्णतः फंड मॅनेजर वर अवलंबून असतात, त्यामुळे फंड मॅनेजरने काही चूक केली तर त्यात आपण काही करू शकत नाही.
  • मर्यादित नियंत्रण – SIP चे पैसे हे कुठे गुंतवायचे हे आपल्या हातात नसते, गुंतवणूकदाराला म्यूचुअल फंड वर आणि त्या फंड मॅनेजरवर विश्वास ठेवावाच लागतो, त्याला काही पर्याय नसतो.

सारांश :

SIP करताना खूप चुका होत असतात, परिणामी रिटर्न्स कमी मिळतात, त्यामुळे खालील पॉईंट्स लक्षात ठेवा आणि तुमचे रिटर्न्स वाढवा.

  • SIP गुंतवणूक ही ५ वर्षासाठी करावी.
  • एका वर्षाआधी SIP मधून पैसे काढू नये, नाहीतर १५% शॉर्ट टर्म गेन टॅक्स लागेल.
  • एक्जिट लोड चे गणित नीट समजून घ्या, नाहीतर उगाचच पैसे कट होतील.
  • डायरेक्ट म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करा, मध्यस्ती ला उगाचच पैसे का द्यायचे.
  • ग्रोथ प्लान मध्ये गुंतवणूक करा, जास्त पैशाची गुंतवणूक होते आणि रिटर्न्स वाढतात.
  • इक्विटि आणि डेब्ट म्यूचुअल काय आहेत ते समजून घ्या आणि त्याप्रमाणे गुंतवणूक करा.

काय आपले पैसे SIP मध्ये सुरक्षित आहेत | IS our money safe in SIP in marathi :

हो, आपले पैसे SIP मध्ये सुरक्षित असतात, कारण शेअर मार्केट हे सेबीद्वारे रेग्युलेत केले जाते, आणि SEBI शेअर मार्केट मधील उत्तम रेग्युलेटर आहे, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तुम्ही सेबी कडे तक्रार करू शकता.

  • SEBI मध्ये तक्रार करण्यासाठी SEBI च्या वेबसाइड (https://scores.gov.in/) वर जाऊन लॉगइन करा.
  • तक्रार फॉर्म (complaint form) डाउनलोड करा.
  • तुमची तक्रार बद्दलची पूर्ण माहिती द्या, तक्रारींशी निगडित सगळे पुरावे किंव्हा डॉक्युमेंट त्याला जोडा आणि ते exchange’s investor service center मध्ये पोस्टाने किंव्हा स्वतः जाणून सबमिट करा.
  • त्यानंतर तुम्हाला एक reference नंबर दिला जाईल, ज्याने तुम्हाला update मिळत जाईल.

निष्कर्ष :

जसे काय बरोबर आहे, तसेच काय चुकीचे आहे ते सुद्धा माहीत असणे तितकेच महत्वाचे असते, त्यामुळे SIP करताना काय चुका होऊ शकतात, ते जाणून घेणे गरजेचे आहे.

आणि ह्या बद्दल काही प्रश असतील तर तुम्ही ते आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करून कळवू शकता, आम्ही त्याचे उत्तर नक्कीच देऊ, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट.

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

FAQs

  1. Q: What is high risk in SIP in marathi ?

    Ans: SIP ही शेअर मार्केटशी लिंक आहे आणि शेअर मार्केट मध्ये जोखीम असते, हेच शेअर मार्केट मधील सर्वात मोठे रिस्क आहे.

  2. Q: Can SIP give negative returns in marathi ?

    Ans: होय, SIP मध्ये शॉर्ट टर्म मध्ये नेगेटिव रिटर्न्स मिळू शकतात, कारण शेअर मार्केट शॉर्ट टर्म मध्ये वर खाली होताच असते.

  3. Q: Has anyone lost money in mutual fund in marathi ?

    Ans: होय, प्रतेक गुंतवणूकदाराला म्यूचुअल फंड मधून शॉर्ट टर्म मध्ये लॉस झालाच आहे, मला स्वतःलाही म्यूचुअल फंड मध्ये पहिल्या १ ते २ वर्षामध्ये लॉस झाला आहे, पण दीर्घ काळात प्रॉफिट मिळाले.

  4. Q: Can there be loss in SIP in marathi ?

    Ans:होय, SIP ही शेअर मार्केटशी लिक असल्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये लॉस होतोच.

  5. Q: Which SIP is profitable in marathi ?

    Ans: ५ वर्षापेक्षा जास्त काळ केलेल्या SIP मधून नेहमीच प्रॉफिट होते, फक्त चांगल्या म्यूचुअल फंडची निवड करा, प्रॉफिट नक्कीच मिळेल.

हे पण वाचा :

ह्या Web Stories पण बघा, तुम्हाला नक्कीच आवढतील :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गुंतवणुकीचे १० सोनेरी नियम. माझ्या आरोग्य विम्याचा हफ्ता का फुगतोय ? Financial Freedom म्हणजे काय ? आता कुटुंबाचे बेवारस पैसे मिळवा, RBI ने सुरू केले UDGAM
गुंतवणुकीचे १० सोनेरी नियम. माझ्या आरोग्य विम्याचा हफ्ता का फुगतोय ? Financial Freedom म्हणजे काय ? आता कुटुंबाचे बेवारस पैसे मिळवा, RBI ने सुरू केले UDGAM
रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर