आपल्या वाडवडिलांचे बँकेत असलेले बेवारस पैसे कसे शोधायचे | How to find unclaimed money with UDGAM platform across bank

How to check unclaimed money with UDGAM in marathi, How to find unclaimed deposits in marathi, UDGAM portal step-by-step guide, what is UDGAM platform in marathi, UDGAM unclaimed deposits portal in marathi, UDGAM portal RBI official website, UDGAM portal unclaimed deposits in marathi, unclaimed deposit portal in marathi, What is UDGAM by RBI in marathi, UDGAM portal registration in marathi

Table of Contents

सुरुवात :

भारतात अंदाजे ३५,००० करोड (पस्तीस हजार करोड) रुपये बेवारस पडून आहेत, हे पैसे बँका, विमा कंपन्या आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये बेवारस पडून आहेत. या पैशाचा अजूनपर्यंत कोणी दावा केला नाही आहे, दावा न करण्याचे अनेक कारणे आहेत, जसे की खातेदाराचा मृत्यू, खातेदार त्याच्या खत्याबद्दलची माहिती विसरणे, वैगेरे.

बहुतेक कुटुंबाना त्यांचा वाडीलधाऱ्यांनी ठेवलेला पैसा किंव्हा गुंतवणूक ही माहीतच नसते, त्यानंतर त्या व्यक्तीच्या जाण्याने ते पैसे बँकेत बेवारस पडलेले असतात, ते कोणाला माहीतच नसतात, पण आता ते तुम्ही UDGAM द्वारे शोधू शकता.

RBI ने UDGAM का सुरू केले | Why RBI initiated UDGAM portal in marathi :

RBI ने UDGAM ची सुविधा लोकांना त्यांचे unclaimed amount शोधायला मदत करण्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी केली आहे. ह्या पोर्टल द्वारे लोकांना त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही माणसाची कोणत्याही बँकेमधील बेवारस रक्कम (unclaimed amount) एकाच ठिकाणी सहजपणे बघता येईल. RBI ने UDGAM ची सुविधा सुरू केल्यामुळे बेवारस रक्कम (unclaimed amount) शोधणे आणि ती मिळवणे लोकांना खूप सोपे झाले आहे.

Unclaimed money UDGAM मध्ये कसे शोधायचे | How to find unclaimed money in UDGAM portal in marathi :

UDGAM पोर्टलवर बेवारस रक्कम (unclaimed money) शोधण्यासाठी, आपल्याला पोर्टलवर खाते तयार करणे आवश्यक आहे. आपण हे UDGAM वेबसाइटला भेट देऊन शोधू शकता, UDGAM पोर्टल वर रजिस्टर करून लॉगिन केल्यावर खालील प्रमाणे तुम्ही unclaimed amount बघू शकता.

  • UDGAM portal वेबसाइट वर विजिट करा :- https://udgam.rbi.org.in/unclaimed-deposits/#/register
  • “रजिस्टर” बटन वर क्लिक करा.
  • मोबाइल नंबर, तुमचे नाव आणि पासवर्ड एंटर करा.
  • “रजिस्टर” बटन वर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाइल नंबर वर OTP येईल तो एंटर करून नंबर निश्चित करा.
  • त्यानंतर तुम्ही UDGAM पोर्टल वर लॉगिन व्हाल.
  • “Search for unclaimed deposits” बटन वर क्लिक करा.
  • ज्या व्यक्तीबद्दल माहिती हवी आहे त्या खातेदाराचे नाव एंटर करा.
  • त्यानंतर ज्या बँकेत ती रक्कम आहे असे वाटत असेल ती बँक निवडा.
  • PAN कार्ड नंबर, वोटर आय डी नंबर, ड्रायविंग लायसेंस नंबर, पासपोर्ट नंबर, किंव्हा जन्म तारीख, ह्या पैकी कोणतीही एक माहिती एंटर करा.
  • आणि सर्च बटन वर क्लिक करा.

सर्च बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला UDGAM पोर्टल वर त्या खतेदारा संबंधित जर कोणती बेवारस रक्कम असेल तर दिलेस आणि त्याबद्दल सर्व माहिती मिळून जाईल.

जर Unclaimed deposits मिळाले तर काय करायचे | What to do if you find any unclaimed money with UDGAM in marathi :

जर तुम्हाला UDGAM पोर्टलवर कोणतीही बेवारस रक्कम (unclaimed amount) दिसली, तर तुम्हाला त्या बँकशी संपर्क साधावा लागेल. बँक नंतर आपल्याला दावा प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती आणि लागणारी कागदपत्रे सूचित करेल.

Unclaimed deposits चा दावा करण्याची प्रक्रिया बँक ते बँक वेगवेगळी आहे, बऱ्याच बँक तुम्हाला खालील कागदपत्रे प्रदान करण्यास सांगतील.

  • आपल्या ओळखपत्राची एक प्रत (जसे आपले पॅन कार्ड किंवा आधार कार्ड)
  • आपले पत्ता पुरावा (जसे आपले पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड)
  • खातेदाराच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राची प्रत (जर ठेवी मृत व्यक्तीच्या नावावर असेल)

Disclaimer of UDGAM in marathi:

UDGAM पोर्टल बेवारस रक्कम (unclaimed amount) माहितीचा एक केंद्रीकृत संग्रह आहे. तथापि, पोर्टलवरील माहितीच्या अचूकतेची हमी देत ​​नाही. RBI देखील याची हमी देत ​​नाही की आपण पोर्टलवर शोधलेल्या कोणत्याही unclaimed deposits चा आपण दावा करू शकाल. users ने ही माहिती स्वतः चेक करून पहावी.

UDGAM पोर्टल द्वारे आपण कोणकोणत्या बँकेमधील बेवारस रक्कम बघू शकतो :

सध्यातरी ही सुविधा काही क्वचितच बँके पर्यन्त मर्यादित आहे, ह्या सुविधा मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धनलक्ष्मी बँक, साऊथ इंडिया बँक आणि DSB बँक यांचा समावेश आहे, पण १५ ऑक्टोबर नंतर सर्व बँक ह्यामध्ये समाविष्ट होतील असे RBI चे म्हणणे आहे.

UDGAM चा कोणाला फायदा होईल | Who is benefited from UDGAM in marathi :

UDGAM पोर्टल द्वारे अनेक लोकांना फायदा होणार आहे, Unclaimed डिपॉजिट असलेले खातेदार, मृत खतेदारांचे वारस, खात्याची माहिती हरवलेले खातेदार आणि बँकेला सुद्धा फायदा होणार आहे, जेणेकरून त्यांना unclaimed डिपॉजिट वर व्याज द्यावे लागणार नाही.

UDGAM चे महत्व | Importance of UDGAM in marathi :

UDGAM पोर्टल unclaimed डिपॉजिट शोधण्यात आणि दावा करण्यात लोकांना मदत करणारा एक महत्त्वपूर्ण साधन आहे. पोर्टलमुळे लोकांना त्यांच्या बेवारस रक्कम (unclaimed deposits) शोधणे आणि दावा प्रक्रिया सुरू करणे सोपे होते. यामुळे लोकांना पैसे मिळू शकतात जे त्यांनी कदाचित कायमचे गमावले असतील असे वाटत होते.

UDGAM ची मर्यादा | Limitation of UDGAM in marathi :

उद्देगम पोर्टल काही मर्यादांसह येतो. एक मर्यादा म्हणजे पोर्टलमध्ये भारतातील सर्व बेवारस रक्कम (unclaimed amount) ची माहिती नसते. फक्त UDGAM योजनेत सहभागी असलेल्या बँका, त्यांच्या डेटा पोर्टलवर अपलोड करतात. दुसरी मर्यादा म्हणजे बेवारस रक्कम (unclaimed amount) चा दावा प्रक्रिया जटिल आणि वेळखाऊ असू शकते. ही विशेषतः खरी आहे जर ठेवी मृत व्यक्तीच्या नावावर असेल.

UDGAM बद्दलच्या शंका कुठे विचायच्या | Where to ask queries about UDGAM in marathi :

जर आपल्याला UDGAM पोर्टलबद्दल कोणतेही प्रश्न असतील, तर आपण RBI च्या हेल्पलाइनवर 1800-22-7788 वर संपर्क साधू शकता. आपण अधिक माहितीसाठी RBI च्या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

निष्कर्ष :

मी आशा करतो की तुम्हाला UDGAM पोर्टल वरुन unclaimed amount बद्दल माहिती कशी मिळवायची हे कळले असेल, तुमचे ह्याबद्दल काही प्रश असतील तर ते आम्हाला कमेन्ट करून नक्कीच कळवा.

FAQs

  1. Q: जर PAN किंव्हा फोन नंबर अपडेट नसेल तरीही unclaimed deposit चे पैसे मिळतील का ?

    Ans: PAN किंव्हा फोन नंबर नसेल तर तुम्ही इतर पर्याय ही वापरू शकता, जसे Voter Id, Driving License, वैगेरे.

  2. Q: Do Mutual Funds have a similar platform to track unclaimed mutual funds in marathi ?

    Ans: म्यूचुअल फंड मध्ये सध्यातरी असा कोणताच पर्याय नाही आहे जिथे unclaimed म्यूचुअल फंड्ज उनिट्स बघता येईल, पण तुम्ही PAN Card आणि ईमेल आय डी च्या मदतीने CAMS कडे ही विनंती करू शकता, CAMS ही माहिती म्यूचुअल फंड खतेदारच्या ईमेल आय डी वर ही माहिती पुरवेल.

  3. Q: Can we search unclaimed saving amount in marathi ?

    Ans: हो, ह्या UDGAM पोर्टल द्वारे आपण बचत खाते आणि फिक्स्ड डिपॉजिट दोन्ही मधील बेवारिस रक्कम बघू शकतो.

  4. Q: Do Indian post offices have similar platform like UDGAM in marathi ?

    Ans: नाही, पोस्ट ऑफिससाठी असा कोणताच पर्याय उपलब्ध नाही.

  5. Q: Do Demat accounts have similar platform to track unclaimed shares like UDGAM in marathi ?

    Ans: नाही, Demat अकाऊंट साठी असा कोणताच पर्याय उपलब्ध नाही.

  6. Q: Where can I register to check unclaimed deposits in marathi ?

    Ans: तुम्ही UDGAM पोर्टल मध्ये ह्या लिंक वर https://udgam.rbi.org.in/unclaimed-deposits/#/register जाऊन रजिस्टर करू शकता आणि अकाऊंट बनवल्यानंतर त्यामध्ये डिटेल्स एंटर करून चेक करू शकता.

हे पण वाचा :

ह्या Web Stories पण बघा, तुम्हाला नक्कीच आवढतील :

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Benefits of investing in Mutual Funds 2023 PE Ratio म्हणजे काय ? डिजिटल रूपी म्हणजे काय ? SIP म्हणजे काय?
Benefits of investing in Mutual Funds 2023 PE Ratio म्हणजे काय ? डिजिटल रूपी म्हणजे काय ? SIP म्हणजे काय?
रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर