कमवा १ करोड फक्त ६०० रुपये SIP ने | Make 1 Crore by Rs 600 SIP investment in Marathi

How much SIP should I do for 1 crore, How to make 1 crore by SIP, How much SIP required for 1 crore in 5 years, How to earn 1 crore in 10 years through SIP, How much to invest in SIP to get 1 crore in 15 years, S I P Calculator, SIP Calculator, mutual fund SIP calculator, returns calculator SIP, SIP return calculator

सुरुवात :

तुम्हाला १ करोड कमवायचे आहेत, कठीण वाटतंय, एवढे पण कठीण नाही आहे जर तुम्हाला इन्वेस्टमेंट ची पॉवर काय आहे हे माहीत असेल तर, विश्वास ठेवा छोटी छोटी रक्कम नेहमी शिस्तीने ने गुंतवत गेलात तर तर तुम्ही नक्कीच १ करोड कामवू शकता फक्त ६०० रूपयाची SIP करून, विश्वास नाही वाटत, चला मी सांगतो १ करोड कसे कमवणार ते, हा आर्टिकल पूर्ण वाचा तुमचा विचार पूर्णपणे बदलून जाईल ह्याची खात्री देतो.

ह्यासाठी सर्वात आधी २ गोष्टी समजून घेणे खूप महत्वाचे आहे ते म्हणजे, SIP म्हणजे काय आणि Power of compounding म्हणजे काय, ते पहिले समजून घेवुया.

SIP म्हणजे काय :

SIP म्हणजे Systematic Investment Plan, म्हणजे दरमहा एक ठराविक रक्कम एका ठरविक काळासाठी गुंतवणे, SIP मुळे तुमच्या पैशाची बचत पण होते आणि गुंतवणूक पण होते, हा एक खूप चांगला पर्याय आहे जर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे आणि तुम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नसेल, SIP बद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर आमचा SIP म्हणजे काय हा आर्टिकल वाचू शकता.

Power of Compounding म्हणजे काय :

Power of Compounding मध्ये गुंतवणूक केलेल्या पैसाच्या व्याजवर व्याज मिळून गुंतवलेली रक्कम खूप पटीने वाढते, ह्यामध्ये interest ची compounding होते आणि ह्या compounding ला अल्बर्ट आइनस्टाइन (Albert Einstein) ने जगातले आठवे आश्चर्य म्हटले जाते आणि ह्या सगळ्याला मराठी मध्ये चक्रवाढ व्याज असे म्हणतात, ह्या चक्रवाढ व्याजाच्या मदतीने आपल्याला ६०० रूपयाच्या SIP ने सुद्धा १ करोड कामावण्यास मदत होते.

६०० रूपयाच्या SIP ने १ करोड कसे कामवायचे असतील तर ह्या ३ गोष्टी खूप महत्वाच्या आहेत :

छोट्या रककमेने करोडो कमवायचे असतील तर SIP चा पर्याय हा एक जादू सारखाच काम करतो, छोटी छोटी रक्कम नेहमी गुंतवत गेलात तर त्याचे व्याजावर व्याज मिळून ती रक्कम वाढतच जाते, पण हे सगळे ३ गोष्टीवर अवलंबून आहे, (१) तुमचे वय काय आहे, (२) तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात किती लवकर करता आणि (३) किती काळ पैसा गुंतवून ठेवता, ह्या गोष्टी का महत्वाच्या आहेत आणि ह्या गोष्टी ने काय होते ते आपण बघूया.

१. तुमचे वय काय आहे : गुंतवणुकीमद्धे तुमचे वय खूप महत्वाचे असेते, कारण जेवढा गुंतवणूक करायला उशीर होतो तेवढा जास्त पैसा गुंतवावा लागतो आणि दुसरे नुकसान म्हणजे जसजशी तुम्ही गुंतवणूक करायला उशीर करता तसतसे तुमचे रिटर्न्स पण कमी होतात.

२. गुंतवणूक किती लवकर करता : गुंतवणूक किती लवकर करता हे पण तितकेच महत्वाचे आहे, कारण जर तुम्ही २० च्या ऐवजी ३० आणि ३० च्या ऐवजी ४० साव्या वर्षात गुंतवणूक सुरू करता तर तुम्हाला ३ ते ४ पटीने जास्त रक्कम गुंतवावी लागते (म्हणजे २००% ते ३००% जास्त रक्कम), उदाहरण म्हणून हे एक cost of delay चे उदाहरण बघा.

Cost of delay in SIP
Cost of Delay

३. दीर्घकाळ गुंतणूक करणे : तिसरा महत्वाचा मुद्धा म्हणजे तुम्ही किती काळ पैसे गुंतवून ठेवता, ही थोडी कंटाळवाणी गोष्ट वाटते पण विश्वास ठेवा जगातील सर्वात मोठा इन्वेस्टर वॅरेन बफेट पण वारंवार दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचाच सल्ला देतो, कारण त्यांची स्वतची ५०% पेक्षा गुंतवणूक शेवटच्या ३ ते ४ वर्षातच वाढली आहे, ह्यालाच म्हणतात compound interest ची जादू.

फक्त ६०० रूपयाच्या SIP ने १ करोड कसे कामवायचे | How to earn 1 Cr by Rs 600 SIP only in Marathi :

६०० रुपयाच्या SIP ने १ करोड कमावणे हे ४ पर्यायाने शक्य आहे, ह्या ४ पैकी कोणत्याही एका पर्यायाने १ करोड कमवू शकतो. (१) Step-up SIP, (२) Incremental SIP (म्हणजे SIP रक्कम वाढवून), (३) Constant SIP (एकाच रक्कम न वाढवता गुंतवणे), आणि (४) Lumpsum Investment, चला तर सविस्तर मध्ये बघूया.

1. Step-up SIP :

स्टेप-अप SIP म्हणजे दरवर्षी एका ठराविक % (टक्केवारी) ने SIP ची रक्कम वाढवणे, ते आपल्या वयाच्या प्रमाणे कसे करायचे ते बघूया.

वय २० वर्षे असेल : ६०० रुपयाची SIP, दरवर्षी ३% ने वाढवाली तर १२% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ६० व्या वर्षी १ करोड मिळतील, आणि हे १००% शक्य आहे.

वय २५ वर्षे असेल : ६०० रुपयाची SIP, दरवर्षी ७% ने वाढवली तर १३% CAGR रिटर्न्स च्या हिशोबाने ६० व्या वर्षी तुम्हाला १ करोड मिळतील.

वय ३० वर्षे असेल : ६०० रुपयाची SIP, दरवर्षी १३% ने वाढवली तर १३% CAGR रिटर्न्स च्या हिशोबाने ६० व्या वर्षी तुम्हाला १ करोड मिळतील.

वय ४० वर्षे असेल : २,५०० रुपयाची SIP, दरवर्षी ती १३% ने वाढवली तर १५% CAGR रिटर्न्स च्या हिशोबाने नक्कीच तुम्हाला ६० व्या वर्षी १ करोड मिळतील.

इथे आम्ही एक उदाहरण म्हणून २०, २५, ३० आणि ४० हे वय घेतले आहे, पण तुम्ही तुमच्या वयानुसार हे चेक करू शकता, आम्ही तुमच्यासाठी SIP calculator ची एक excel sheet बनवली आहे आणि त्याची लिंक खाली दिली आहे, त्यात तुम्ही तुमच्या वयाप्रमाणे बदल करून किती रक्कम गुंतवावी हे बघू शकता.

Excel link – 600 to 1 Crore SIP Calculator

2. Incremental SIP :

Incremental SIP म्हणजे एका ठराविक रकमेणे एका ठराविक वर्षांमध्ये SIP ची रक्कम वाढवणे, हे कसे करायचे ते सविस्तर मध्ये बघूया.

वय २० वर्षे असेल : ६०० रुपयाची SIP, दर ३ वर्षांने ७० रुपयाने वाढवाली तर १२% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ६० व्या वर्षी तुम्हाला १ करोड मिळतील.

वय २५ वर्षे असेल : ६०० रुपयाची SIP, दर ३ वर्षांने २०० रुपयाने वाढवाली तर १३% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ६० व्या वर्षी तुम्हाला १ करोड मिळतील.

वय ३० वर्षे असेल : ६०० रुपयाची SIP, दर ३ वर्षांने ६४० रुपयाने वाढवली तर १३% CAGR रिटर्न्स च्या हिशोबाने ६० व्या वर्षी तुम्हाला १ करोड मिळतील.

वय ४० वर्षे असेल : २,५०० रुपयाची SIP, दर ३ वर्षांमध्ये १,८५० रुपयाने वाढवाली तर १५% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ६० व्या वर्षी तुम्हाला १ करोड मिळतील.

3. Constant SIP :

Constant SIP म्हणजे रक्कम न वाढवता एकाच रकमेची SIP करत रहाणे , जर तुम्हाला दरवर्षी SIP ची रक्कम वाढवायची नसेल, एकच रक्कम दरवर्षी गुंतवत राहायची असेल तर तसेही करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला जास्त रक्कम गुंतवावी लागेल, ती किती आणि कशी ते पाहूया.

वय २० वर्षे असेल : ७५४ रुपयाची SIP, दरवर्षी न विसरता करत राहिलात तर १२% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ६० व्या वर्षी तुम्हाला १ करोड मिळतील.

वय २५ वर्षे असेल : १,०४१ रुपयाची SIP, दरवर्षी न विसरता करत राहिलात तर १३% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ६० व्या वर्षी तुम्हाला १ करोड मिळतील.

वय ३० वर्षे असेल : २,००४ रुपयाची SIP, दरवर्षी न विसरता करत राहिलात तर १३% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ६० व्या वर्षी तुम्हाला १ करोड मिळतील.

वय ४० वर्षे असेल : ५,७१२ रुपयाची SIP, दरवर्षी न विसरता करत राहिलात तर १५% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ६० व्या वर्षी तुम्हाला १ करोड मिळतील.

4. Lumpsum Investment :

Lumpsum इन्वेस्टमेंट म्हणजे एकत्रितपणे एक मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवणे, समझा कधी तुमचा बोनस झाला किंव्हा कोणते पैसे अचानक मिळाले तर ते तुम्ही Lumpsum ह्या पर्याया द्वारे म्यूचुअल फंड मध्ये गुंतवू शकता, असे केल्याने तुमच्या गुंतवणुकीमद्धे वाढ होते आणि जास्त रिटर्न्स मिळण्यास मदत होते.

वरील सर्व सल्यामद्धे आम्ही उदाहरण म्हणून २०, २५, ३० आणि ४० हे वय घेतले आहे, पण तुम्ही तुमच्या वयानुसार हे चेक करू शकता, आम्ही तुमच्यासाठी SIP calculator ची एक excel sheet बनवली आहे आणि त्याची लिंक खाली दिली आहे, त्यात तुम्ही तुमच्या वयाप्रमाणे बदल करून किती रक्कम गुंतवावी हे बघू शकता.

Excel link – 600 to 1 Crore SIP Calculator

१ करोड कमवण्यासाठी गुंतवणूकेची शिस्त असणे खूप महत्वाचे :

पण ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे “गुंतवणूकेची शिस्त”, वरील दिलेल्या सल्याप्रमाणे जर तुम्ही शिस्त ठेवून दरवर्षी ६० वर्षापर्यंत गुंतवणूक करत राहिलात तर आणि तरच तुम्ही ठरवलेली रक्कम मिळवू शकता, नाहीतर शक्य होणार नाही, त्यामुळे लक्षात ठेवा, शिस्तीने दरवर्षी गुंतवणूक करत रहा, नक्कीच तुम्हाला ठरवलेली रक्कम मिळणे शक्य होईल.

१ करोड कमवण्यासाठी सर्वोत्तम म्यूचुअल फंड कसा निवडावा :

चांगला म्यूचुअल फंड निवडणे हेही तितकेच महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळण्यास मदत होईल आणि १ करोड कमवू शकाल, चांगला म्यूचुअल फंड निवडणे हे सर्वतः तुमच्या रिस्क प्रॉफिल वर अवलंबून आहे, तुमची जोखीम घेण्याची किती क्षमता किती आहे हे तुम्ही नक्कीच चेक केले पाहिजे, पण शेअर मार्केट ची काहीच माहिती नसेल तर Large cap Index Fund मध्ये गुंतवणूक करणे अति उत्तम, कारण लार्ज कॅप इंडेक्स फंड मध्ये भारतातील टॉप ३० कंपण्यामद्धे गुंतवणूक केली जाते आणि त्या कंपन्या खूप सुरक्षित मानल्या जातात.

लार्ज कॅप इंडेक्स फंड ची निवड करण्यासाठी फक्त २ ते ३ पॉईंट्स लक्षात ठेवावे लागतात, (१) Expense Ratio – सर्वात कमी असणे उत्तम, (२) Tracking Error – सर्वात कमी असणे उत्तम, (३) Reputed Fund House – इंडेक्स फंड ज्या फंड हाऊस चा आहे त्याचे मार्केट मध्ये नाव कसे आहे, तो प्रसिद्ध आहे की नाही, थोडक्यात बँकिंग फंड हाऊस निवडणे योग्य ठरेल, (उदा: HDFC Mutual Fund, ICICI Mutual Fund, Axis Mutual Fund, etc.)

निष्कर्ष :

आम्ही आशा करतो की तुम्हाला समजले असेल की १ करोड कामावण्यासाठी किती रकमेची SIP करावी लागेल आणि किती काळ करावी लागेल, एथे मी फक्त १ करोड चेच उदाहरण घेतले आहे, पण हेच लॉजिक १० करोड साठी पण लागू होते, कारण जर ६०० रुपयाने १ करोड कमवले जातात, तर ६,००० रूपयाच्या SIP ने १० करोड रुपये कमवू शकतो, म्हणून लवकर SIP सुरू कर आणि करोडपती व्हा. ह्या बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करून विचारा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.

FAQs

  1. Q: How much to invest in SIP to make 1 Crore in 5 Years in Marathi ?

    Ans: ५ वर्षामध्ये १ करोड कमवायचे असतील तर ९५,५०० रुपयाची SIP १२% CAGR रिटर्न च्या हिशोबाने करावी लागेल आणि १५% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ८६,५०० रुपयाची SIP करावी लागेल.

  2. Q: How much to invest in SIP to make 1 Crore in 10 Years in Marathi ?

    Ans: १० वर्षामध्ये १ करोड कमवायचे असतील तर ३६,८०० रुपयाची SIP १२% CAGR रिटर्न च्या हिशोबाने करावी लागेल आणि १५% CAGR रिटर्न च्या हिशोबाने ३०,१०० रुपयाची SIP करावी लागेल.

हे पण वाचा :

ह्या Web Stories पण बघा, तुम्हाला नक्कीच आवढतील :

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

SIP ने करोंडपती बनायचे आहे, ह्या चुका करू नका PE Ratio म्हणजे काय ? How to become successful investor in Marathi Benefits of investing in Mutual Funds 2023
SIP ने करोंडपती बनायचे आहे, ह्या चुका करू नका PE Ratio म्हणजे काय ? How to become successful investor in Marathi Benefits of investing in Mutual Funds 2023
रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर