पैशाचे १० महत्वाचे नियम सुरक्षित भविष्यासाठी | Top 10 rules of Personal finance 2024 in marathi

सुरुवात :

पगार आला की पैसे कसे आणि कुठे जातात हे बहुतेक लोकांना कळतच नाही, पैसे उरतच नाहीत, असे बहुतेक लोकांचे म्हणणे आहे, कारण बहुतेक लोकांना माहीतच नसते की पैसे वाचवायचे आणि वाढवायचे कसे.

आजच्या दिवशी म्हणजे २०२३ मध्ये भारताची आर्थिक साक्षरता फक्त २७% आहे, जी भारताबाहेरील देशांपेक्षा खूप कमी आहे, म्हणून खूप कमी लोकांना पैशाच्या ह्या नियमांबद्दल माहिती आहे.

आपण ह्या 10 rules of personal finance आर्टिकल मध्ये अगदी सोप्या भाषेत हे नियम समजून घेणार आहोत जे १० ते १२ वर्षाच्या मुलाला देखील समजतील.

Disclaimer for 10 rules of personal finance :

हे १० नियम बघण्याआधी एक सांगू एच्छितो की, हे सामान्य नियम आहेत जे काही ठराविक नेहमीच्या गरजा लक्षात घेता बनवले आहेत, कारण प्रतेकांच्या आवडी, निवडी किंव्हा अपेक्षा वेगवेगळ्या अशू शकतात.

त्यानुसार हे नियम बदलू शकतात पण ह्या नियमामुळे नक्कीच तुम्हाला पैसे कसे सांभाळायचे आणि कसे वाढवायचे याचे मूलभूत ज्ञान मिळेल.

१. पहिले स्वतःला पैसे द्या | Pay yourself first rule in Marathi :

स्वताला पैसे द्या म्हणजे खर्च करण्याआधी पहिले पैसे बचत करा, आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे याची यादी बनवा, म्हणजे तुमच्या इच्छा काय आहे.

उदहरणार्ध: निवृत्ती (रिटायरमेंट), लग्न, मुलांचे शिक्षण, एखाद्या ठिकाणी फिरायला जाणे, वैगेरे, यांची एक यादी बनवा आणि यासाठी किती पैसे लागणार आहेत हे माहीत करून घ्या आणि त्यामुळे तुमच्या इच्छांसाठी तुम्हाला किती पैसे वाचवावे लागतील हे कळेल.

२. पैशाचा ५०-३०-२० नियम | 50-30-20 rule of money in Marathi :

५०-३०-२० नियम म्हणजे तुमच्या महिन्याच्या पगरातील पैशाचे ५०%/३०%/२०% ह्या मध्ये विभाजन करा, त्यानंतर ५०% गरजेच्या गोष्टी साठी म्हणजे घरातील जेवणाचे सामान, विजेचे बिल, पानी बिल, वैगेरे ह्या आवश्यक गोष्टी साठी वापरा.

बाकीचे ३०% पैसे आवाढत्या गोष्टी म्हणजे नवीन कपडे, मोबाइल, फिरणे, वैगेरे ह्यासाठी खर्च करा आणि राहिलीले २०% पैसे बचत करून गुंतवणूक करा, जेणेकरून वेळेनुसार ते पैसे वाढतील आणि महागाई पेक्षा जास्त रिटर्न्स मिळतील.

ह्या रुल मुळे तुमच्यावर जास्त भर येणार नाही, नेहमीचा खर्च भागेल, आवडीप्रमाणे मजा करायला मिळेल आणि तुमच्या पैशांची गुंतवणूक ही होईल.

३. ६ पट आपत्कालीन फंड नियम | 6X Emergency Fund rule in marathi :

तुमच्या ६ महिन्याच्या खर्चा एवढा एक आपत्कालीन निधी तयार करा, कधी नोकरी बंद झाली तर नवीन नोकरी मिळेपर्यंत ह्या निधीतून तुमच्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च चालेल, नोकरी करत असाल तर हा निधी महिन्याच्या खर्चाच्या ६ पट असला पाहिजे आणि जर तुमचा बिझनेस असेल तर १२ पट असला पाहिजे.

ह्या निधी साठी लागणारे पैसे तुम्ही FD किंव्हा लिक्विड म्यूचुअल फंड मध्ये ठेऊ शकता, कारण हे पर्याय खूप सुरक्षित मानले जातात जेणेकरून ते पैसे गरजेच्या वेळी लगेच उपयोगी येतील.

४. २० पट जीवन विमा नियम | 20X Life Insurance rule in marathi :

जीवन विमा हा तुमच्या वर्ष भरच्या खर्चाच्या २० पट एवढा असला पाहिजे, पण २० पट का, कारण जीवन विमा आपल्या नंतर आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या मुलांच्या काळजी साठी असतो.

आपली मुले लहान असल्यामुळे २० वर्षापर्यंत त्यांचे शिक्षण होईपर्यंत ते पैसे पुरेशे असले पाहिजे, म्हणून जीवन विमा वर्षाच्या खर्चाच्या २० पट असला पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे टर्म लाइफ इन्शुरेंस घ्या, ह्यामध्ये प्रीमियम खूप कमी असते आणि कवर जास्त मिळते.

५. आरोग्य विमा नियम | Health Insurance rule in marathi :

आरोग्य विमा खूप महत्वाचा आहे, कारण आजकाल हॉस्पिटल चा खर्च खूप वाढला आहे आणि तो सर्वसामान्य माणसाला परवडत नाही, आजारी पडल्यावर जर इन्शुरेंस नसेल तर बचत केलेले पैसे झपाट्याने संपतात.

म्हणून जीवन विमा घेणे खूप महत्वाचे आहे, जीवन विमा शक्यतो तुमच्या परिसरामधील एका ऑपरेशन ला लागणाऱ्या खर्चा एतका असला पाहिजे, एक चांगला आरोग्य विमा निवडा जेणेकरून तो क्लेम केल्यावर रद्द होणार नाही.

चांगला आरोग्य विमा निवडण्यासाठी काही गोष्टी चेक कराव्या लागतात, त्याची माहिती तुम्हाला सर्वोत्तम आरोग्य विमा कसा निवडायचा ह्या आर्टिकल मध्ये सविस्तर मध्ये मिळेल.

६. ४०% कर्ज नियम | 40% EMI Rule in marathi :

भारतामध्ये कर्ज खूप घेतले जातात आणि खूप लोक कर्जबाजारी आहेत, कारण त्यांना माहीतच नसते की किती कर्ज घेणे योग्य असते आणि जास्त कर्ज घेतात, पण तसे नाही केले पाहिजे.

तुमच्या सगळ्या कर्जाच्या महिन्याचा हफ्ता म्हणजे EMI हा तुमच्या महिन्याच्या पगाराच्या ४०% पर्यंतच असला पाहिजे, नाहीतर तुमचे संपूर्ण जीवन कर्ज फेडण्यामध्येच निघून जाइल आणि बचत किंव्हा गुंतवणूक केली जाणार नाही.

७. रुल ऑफ ७२ चा नियम | Rule of 72 in Marathi :

कोणतीही गुंतवणूक करताना आपल्याला नेहमी एक प्रश्न पडतो की व्याज किती मिळणार आणि पैसे किती वर्षात डब्बल होणार, हे आपल्याला लगेच कळत नाही किंव्हा मोजायला येत नाही.

पण ह्या रुल ऑफ ७२ मुळे तुम्हाला १ मिनिटात कळेल की गुंतवलेले पैसे किती वर्षात डब्बल होणार, फक्त (७२ भगिले मिळणारे व्याज) हे कॅलक्युलेशन करावे लागेल.

म्हणजे उदाहरण म्हणून समझा FD मध्ये ७% रिटर्न्स मिळतात, म्हणून ७२ भगिले ७ केले की उत्तर येते १०.३, म्हणजे तुमचे पैसे अंदाजे १० वर्षामध्ये डब्बल होणार असे समझा.

८. इक्विटि मध्ये गुंतवणूक करण्याचा नियम | (100 – Age rule) Equity investment rule in marathi :

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना नेहमी प्रश पडतो की किती पैसे शेअर मार्केट गुंतवावे, पण उत्तर मिळत नाही. ह्या 100 – Age रुल मुळे कळते की आपल्याला शेअर मार्केट मध्ये किती पैसे गुंतवणे योग्य आहे.

ह्या रूल नुसार १०० मधून तुमचे वय वजा केल्यास जो आकडा येतो तेवढे % पैसे तुम्ही इक्विटि मध्ये गुंतवले पाहिजे आणि बाकीचे डेब्ट म्हणजे सोने, PPF, FD, वैगेरे.

९. २५ पट निवृत्ती नियम | 25X Retirement Rule in marathi :

तुम्हाला कधी असा प्रश पडला आहे काय की तुम्हाला निवृत्ती साठी (रिटायरमेंट) किती पैसे हवे आहेत, ह्या रुल नुसार तुमच्या वर्षाच्या खर्चाच्या २५ पटी एवढे पैसे तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट साठी ठेवावे लागतील.

समझा तुम्ही ६० वयामद्धे रिटायर झालात तर अंदाजे २० ते २५ वर्ष जीवन जगाल म्हणून २५ पटी एवढे पैसे ठेवावे लागतील, पण हा रूल फक्त ६० मध्ये रिटायर होणाऱ्यांसाठीच लागू होतो, कारण जर कोणी ५० वयामद्धे रिटायर होत असेल तर आणखी जास्त पटीने पैसा ठेवावा लागेल.

१०. पहिली गुंतवणूक नंतर खर्च नियम | 1st week investment rule in marathi :

वरील सर्व रूल तेव्हाच कामी येतील जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल, म्हणून हा नियमही तेवढाच महत्वाचा आहे. बहुतेकदा आपण सर्व आधी खर्च करतो आणि नंतर बचत आणि गुंतवणूक करतो, पण ह्या नियमानुसार आधी गुंतवणूक करा आणि नंतर खर्च करा.

ज्यादिवशी तुमचा पगार होतो त्या दिवसाच्या १ ते २ दिवसामध्येच तुम्ही ठरवलेली गुंतवली केली पाहिजे, तरच तुमची गुंतवणूकेची सवय कायम राहील आणि तुमचे पैसे वेळेनुसार वाढण्यास मदत होईल.

ह्या व्यतिरिक्त काही आणखी नियम ही आहेत ते सुचवू इच्छितो :

१. गुंतणूक केलेले पैसे वेळोवेळी तपासून पहा, ज्या पर्यायामद्धे गुंतवणूक केली आहे तो नेहमीच योग्य पर्याय असेलच असे नाही, म्हणून वेळोवेळी पर्याय चेक करा आणि योग्य तो बदल ही करा.
२. सगळे पैसे एकाच ठिकाणी गुंतवून ठेवू नका, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करा, जेणेकरून काही गुंतवणूक चुकीची ठरली तर बाकीच्या गुंतवणुकीचा आधार होईल.
३. नेहमी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा, कारण दीर्घकाळामद्धे compounding च्या जादू मुळे व्याजवर व्याज मिळून पैसे इतके वाढतात की महागाई पेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात.

निष्कर्ष :

जसे आम्ही सांगितले की हे नियम काही ठराविक नेहमीच्या गरजा लक्षात घेता बनवले आहेत, जे प्रतेकच्या परिस्थिति नुसार बदलू ही शकतात, पण हे रूल माहीत असणे गरजेचे आहे, कारण भरपूर लोकांना ह्या रूल चा फायदा झाला आहे, कोणाला नुकसान झाले नाही. हे रूल स्वताच्या आयुष्यात वापरताना एकदा तज्ञाचा सल्ला घ्या किंव्हा फायनॅन्स बद्दल माहिती घ्या आणि मगच वापरा.

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

FAQs

  1. Q: What is the purpose of an emergency fund and how much should I save in it in marathi ?

    Ans: एमर्जन्सि फंड हा अचानक काही पैशाची अडचण आली तर ती पूर्ण करण्यासाठी असतो, उदाहरण म्हणून नोकरी गेली तर नवीन नोकरी मिळेपर्यंत घर खर्च चालवण्यासाठी हा फंड तयार करायचा असतो.

  2. Q: What are the benefits of personal finance rule in marathi ?

    Ans: हे पर्सनल फायनॅन्स चे नियमामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो, तुम्ही ठरवलेली रक्कम तुम्हाला मिळेल, तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकाल, तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व्हाल.

हे पण वाचा :

ह्या Web Stories पण बघा, तुम्हाला नक्कीच आवढतील :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

How to become successful investor in Marathi PE Ratio म्हणजे काय ? Psychology of Money book मराठी मध्ये समजून घ्या SIP ने करोंडपती बनायचे आहे, ह्या चुका करू नका
How to become successful investor in Marathi PE Ratio म्हणजे काय ? Psychology of Money book मराठी मध्ये समजून घ्या SIP ने करोंडपती बनायचे आहे, ह्या चुका करू नका
रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर